अनेकांच्या नखांवर पांढरे डाग कशाचे असतात? पाहिले तर असतील पण माहीत नसेल कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:08 IST2026-03-10T17:08:19+5:302026-03-10T17:08:53+5:30
Nail Facts : आज आम्ही आपल्याला नखांबाबत असं काही सांगणार आहोत, जे आपण नोटीस केलं असेल, पण त्यामागचं कारण माहिती नसेल.

अनेकांच्या नखांवर पांढरे डाग कशाचे असतात? पाहिले तर असतील पण माहीत नसेल कारण
Nail Facts : रोज सकाळी झोपेतून उठल्यावर रात्री झोपेपर्यंत आपल्याला अशा अशा गोष्टी जाणवतात ज्या सामान्य नसतात. पण आपण त्यामागील कारणं जाणून घेण्याचा फार प्रयत्न करत नाही. या गोष्टींकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. आपण आपल्या शरीराबाबत देखील असंच करतो. पण जर शरीरात काही बदल दिसत असतील तर आपल्याला त्याबाबत प्रश्न पडला पाहिजे किंवा मग त्याबाबत जाणून घेतलं गेलं पाहिजे. पण लोक सहजपणे कानाडोळा करतात. आज आम्ही आपल्याला एका अशाच गोष्टीबाबत सांगणार आहोत. आम्ही आपल्याला नखांबाबत असं काही सांगणार आहोत, जे आपण नोटीस केलं असेल, पण त्यामागचं कारण माहिती नसेल.
नखांवर पांढरा डाग कशाचा?
आपण पाहिलं असेल की, अनेक लोकांच्या नखांवर एक पांढरा डाग असतो. जिथून नखं उगवतात, सामान्यपणे तिथे हा पांढरा डाग बघायला मिळतो. कदाचित आपल्या नखांवर देखील हा पांढरा डाग असेल. पण यामागचं कारण आपल्याला माहीत नसेल. हा डाग मुळात ल्यूकोनीशियामुळे होतो. जो एक कॉमन आजार आहे. जिथून नखं उगवतात, तिथे जर हा डाग असेल तर तो ल्यूकोनीशियामुळे असतो. तेच जर पांढरे डाग नखांच्या खालच्या बाजूला असलेल्या त्वचेवर असतील तर ते अपेरंट ल्यूकोनीशियामुळे येतात. तेच जर हेच डाग नखांवर असेल तर ते स्यूडोल्यूकोनीशियामुळे दिसतात.
कोणत्या कारणांनी होतो ल्यूकोनीशिया?
आता आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की, ल्यूकोनीशिया कोणत्या कारणाने होतो. तर यामागचं एक कारण अॅलर्जी असू शकतं. नखांवर वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्समुळे अॅलर्जी होऊ शकते आणि यामुळे असे डाग येतात. त्याशिवाय एखाद्या जखमेमुळेही असे डाग तयार होऊ शकतात. कधी कधी एखाद्या फंगल इन्फेक्शनमुळेही नखांवर असे पांढरे डाग येऊ शकतात. तसेच अनेकदा औषधांच्या साइड इफेक्टमुळेही असं होतं.