प्लॅटफॉर्म रिकामे असूनही स्टेशनच्या आधीच का थांबवली जाते रेल्वे? जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:32 IST2026-02-28T15:32:09+5:302026-02-28T15:32:41+5:30
Interesting Facts : आज आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित अशी एक माहिती सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही आधी कधी विचारही केली नसेल.

प्लॅटफॉर्म रिकामे असूनही स्टेशनच्या आधीच का थांबवली जाते रेल्वे? जाणून घ्या यामागचं कारण...
Interesting Facts : भारतात राहणारे जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. खासकरून मध्यमवर्गीय लोक सर्वाधिक प्रवास रेल्वेनेच करतात, कारण रेल्वेचे तिकीट तुलनेनं स्वस्त आणि बजेटमध्ये असतं. लांब अंतराच्या प्रवासासाठीही लोक रेल्वेचीच निवड करतात, कारण बसच्या तुलनेत रेल्वेमध्ये अधिक आराम मिळतो. एकूणच कारणे वेगवेगळी असली तरी जवळपास प्रत्येकाने आयुष्यात कधीतरी रेल्वेने प्रवास केलेलाच असतो. आज आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित अशी एक माहिती सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही आधी कधी विचारही केली नसेल.
आउटरवर का थांबते रेल्वे?
तुम्ही अनेक वेळा रेल्वेने प्रवास केला असेल. कधी रेल्वे वेळेवर येते, तर कधी उशिरा प्लॅटफॉर्मवर पोहोचते. रेल्वे उशिरा येत असेल तर प्रवाशांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की रेल्वे अजून का आली नाही. अशा वेळी बहुतेक वेळा उत्तर मिळते की रेल्वे आउटरवर थांबली आहे.
प्लॅटफॉर्म रिकामे असतानाही असे का होते?
लोकांच्या मनात लगेच प्रश्न येतो की इतके प्लॅटफॉर्म रिकामे असताना रेल्वेला आउटरवर का थांबवलं जातं? याचं कारण म्हणजे प्रत्येक स्टेशनवर विशिष्ट रेल्वेसाठी ठराविक प्लॅटफॉर्म निश्चित केलेला असतो. उदाहरणार्थ, समजा रेल्वे A आणि रेल्वे B या दोन्हींसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ निश्चित आहे. जर त्या वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे B उभी असेल, तर रेल्वे A ला स्टेशनच्या बाहेर म्हणजे आउटर सिग्नलवर थांबावं लागतं, जरी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ रिकामे असले तरी.
ही व्यवस्था रेल्वेच्या सिग्नलिंग, वेळापत्रक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी केली जाते. म्हणूनच कधी कधी प्लॅटफॉर्म रिकामे दिसत असले तरी ट्रेन आउटरवर थांबलेली असते. हे सर्व व्यवस्थापन Indian Railways च्या सिग्नलिंग आणि ऑपरेशन प्रणालीचा एक भाग आहे.
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X का लिहितात?
भारतात धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मागेच असा साइन असतो. पॅसेंजर रेल्वेंच्या मागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हा साइन काढलेला असतो. हा साइन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणं गरजेचं आहे. हा नियम भारतीय रेल्वेनेच केला आहे. यासोबतच तुम्ही हे पाहिलं असेल की, काही रेल्वे डब्यांवर एलव्ही असंही लिहिलं असतं. सोबतच रेल्वेच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतो. रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एलव्ही लिहिण्याचा अर्थ असा की, हा डबा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. हा एलव्ही नेहमी X या साइनने लिहिला जातो.