रेल्वेच्या इंजिनचे रंग वेगवेगळे का असतात? पाहा प्रत्येक रंगाचा काय असतो उद्देश आणि अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:34 IST2026-04-04T15:33:13+5:302026-04-04T15:34:24+5:30
Railway Engine Colour Facts : भारतीय रेल्वेची इंजिने वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवली जातात. या रंगांचा एक खास अर्थ आणि उपयोग असतो

रेल्वेच्या इंजिनचे रंग वेगवेगळे का असतात? पाहा प्रत्येक रंगाचा काय असतो उद्देश आणि अर्थ
Railway Engine Colour Facts : रेल्वेने आपण अनेकदा प्रवास केला असेल. कधी जवळचा प्रवास केला असेल तर कधी लांबचा प्रवास केला असेल. प्रवासादरम्यान आपण पाहिलं असेल की, रेल्वेला वेगवेगळ्या रंगाचे डबे असतात. त्या रंगाचा काही खास अर्थही असतो. तसेच आपण पाहिलं असेल की, वेगवेगळ्या रेल्वेच्या इंजिनांचा देखील रंग वेगळा असतो. आज आपण हेच समजून घेणार आहोत की, रेल्वेच्या इंजिनांचा वेगळा रंग आपल्याला काय सांगतो.
भारतीय रेल्वेची इंजिने वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवली जातात. या रंगांचा एक खास अर्थ आणि उपयोग असतो. रंग बघून अनेकदा अंदाज लावला जाऊ शकतो ते इंजिन कोणत्या कामासाठी वापरलं जातं.
लाल रंगाचं इंजिन
लाल रंगाचं इंजिन आपण अनेकदा पाहिलं असेल. हे लाल रंगाचं इंजिन सामान्यपणे पॅसेंजर किंवा मेल रेल्वेसाठी वापरलं जातं. हे इंजिन लांब पल्ल्याच्या सामान्य रेल्वेला खेचण्यासाठी लावलं जातं. लाल रंग दुरून स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे तो निवडला जातो. लाल रंग रेल्वेमध्ये बऱ्याच वर्षांपासून प्रचलित आहे.
निळा रंग
लाल रंगानंतर इंजिनासाठी वापरला जाणारा रंग म्हणजे निळा. निळ्या रंगाचे इंजिन सुपरफास्ट रेल्वेंमध्ये लावलेले दिसतात. जसे की, राजधानी आणि इतर हाय स्पीड रेल्वेंमध्ये निळ्या रंगाचं इंजिन लावतात. हे इंजिन जास्त वेगवान आणि शक्तीशाली असतं. यांचं डिझाइन सुद्धा हाय स्पीड रेल्वेंनुसार केलेलं असतं.
हिरव्या रंगाचं इंजिन
भारतीय रेल्वेत हिरव्या रंगाचं किंवा पट्ट्या असलेलं इंजिन किंवा डबे मुख्यपणे गरीब रथ एक्सप्रेससारख्या स्वस्त आणि कमी दरात एसी सेवा देणाऱ्या रेल्वेला लावलं जातं. हा रंग कमी खर्चात आरामदायक प्रवासाचं प्रतीक आहे. त्याशिवाय हिरव्या रंगाच्या इंजिनाचा वापर पर्यावरणच्या अनुकूल किंवा बॅटरी-हायड्रोजन संचालित रेल्वेसाठी देखील केला जातो.
पांढऱ्या रंगाचं इंजिन
निळ्यानंतर तिसऱ्या प्रकारचं इंजिन हे पांढऱ्या रंगाचं असतं. पांढऱ्या रंगाचे इंजिन हे अनेकदा इलेक्ट्रिक लोकोमोटिव असतात. हे विजेवर धावणारे अत्यंत आधुनिक इंजिन असतात. या इंजिनांनी प्रदूषण कमी होतं. भारतीय रेल्वे आता अशा इंजिनांच्या वापरावर अधिक भर देत आहे.
पिवळ्या रंगाचं इंजिन
चौथ्या नंबरवर येतं पिवळ्या रंगाचं इंजिन. पिवळ्या रंगाच्या इंजिनांचा वापर रेल्वे खेचण्यासाठी केला जात नाही. हे इंजिन रेल्वे मेंटनेन्सच्या कामासाठी वापरले जातात. तसेच या इंजिनांचा वापर रेल्वे ट्रॅकची पाहणी, दुरूस्ती यासाठी केला जातो. या इंजिनांद्वारे रेल्वे लाइनची सुरक्षा सुनिश्चित केली जाते. पिवळा रंग इशारा आणि सावध राहण्याचं प्रतीक असतो. त्यामुळे मेटेंनेन्स वाहनांमध्ये याचा जास्त वापर होतो.
रेल्वेमध्ये प्रत्येक इंजिनाचा एक वेगळा उद्देश आणि जबाबदारी असते. रंगांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवणं सोपं होतं. याने रेल्वे कर्मचाऱ्यांना सुद्धा काम करण्यास सुविधा मिळते. या व्यवस्थेमुळे रेल्वेचं संचालन अधिक व्यवस्थित होतं.