गायीच्या पोटाला छिद्र हे वाचूनच जरा विचित्र वाटतं ना? इतकंच काय तर भितीदायकही वाटतं. पण यात चुकीचं किंवा वाईट वाटण्यासारखं काही नाही. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. बरं इतकंच नाही तर असं केल्याने गायीचं आयुष्यही वाढतं, असा दावा केला जातो.

गायींच्या पोटाला अशाप्रकारे छिद्र अमेरिकेसोबतच वेगवेगळ्या देशातही पाडलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही समस्या किंवा अडचण न होता गायी जगतात. पोर्टिया टफ्ट्स विश्वविद्यालयातील एक गाय २००२ पासून पोटावरील छिद्रासोबत जगत आहे. काही उद्देशाने गायीच्या पोटात हे छिद्र केलं जातं. हा उद्देश म्हणजे वैज्ञानिक गायीच्या पचनतंत्राचा अभ्यास करू शकतील.

(Image Credit : YouTube)

तसेच अमेरिकेत शेतकरी नेहमी गायीच्या पोटात छिद्र करतात. अमेरिकेतील शेतकरी असं गायींच्या पोटाची स्वच्छता करण्यासाठी करतात. कारण शेतकरी गायींना चरण्यासाठी मोकळं सोडतात. अशात गायी प्लास्टिकच्या पिशव्या खातात आणि त्याने त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. तेव्हा या छिद्रातून हात टाकून पोट साफ केलं जातं.

गायीच्या पोटाला केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेला फिस्टूला किंवा कॅन्यूला असं म्हटलं जातं. गायीच्या पोटावरील हे छिद्र नंतर प्लास्टिकने झाकलं जातं. जेव्हा पोट साफ करायचं असेल तेव्हा ते प्लास्टिक काढलं जातं.

अमेरिकेत गायींच्या पोटावर छिद्र सर्जरी दरम्यान केलं जातं. या सर्जरीत गायीच्या पोटाला इजाही होत नाही आणि याने त्यांच्या आयुष्यावरही काही परिणाम होत नाही.

एका रिपोर्टनुसार, ही प्रक्रिया आताची नाही तर १९२० पासून केली जात आहे. कॅन्यूला सर्जरी दरम्यान गायीच्या पोटात टाकला जातो आणि नंतर गायीला ४ ते ६ आठवडे आराम दिला जातो. नंतर गाय पूर्णपणे फिट राहते.


Web Title: Why do these cows have holes drilled into their sides?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.