स्पोर्ट्स शूजमध्ये एक्स्ट्रा Shoelace Hole कशासाठी असतं? माहीत नसेल तर जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:57 IST2026-03-28T14:44:23+5:302026-03-28T14:57:31+5:30
आज आम्ही आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न आणि त्याचं उत्तरही घेऊन आलो आहोत. महत्वाची बाब म्हणजे ही गोष्ट आपण अनेकदा पाहिली असेल, पण आपल्याला त्याबाबत प्रश्न पडला नसेल किंवा प्रश्न पडलाही असेल तर त्याचं उत्तर माहीत नसेल.

स्पोर्ट्स शूजमध्ये एक्स्ट्रा Shoelace Hole कशासाठी असतं? माहीत नसेल तर जाणून घ्या कारण
झोपेतून जागे झाल्यापासून ते सायंकाळपर्यंत आपण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असतो. या वस्तू किंवा गोष्टी बघून काहींना त्यांबाबत असे प्रश्न पडतात, ज्यांबाबत इतरांनी कुणी विचार केलेला नसतो. यातील काही गोष्टींची उत्तरं फारच इंटरेस्टिंग असतात. पण रोजच्या धावपळीत लोक इतके बिझी असतात की, फार विचार करण्याचा वेळच त्यांच्याकडे नसतो. पण आज आम्ही आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न आणि त्याचं उत्तरही घेऊन आलो आहोत. महत्वाची बाब म्हणजे ही गोष्ट आपण अनेकदा पाहिली असेल, पण आपल्याला त्याबाबत प्रश्न पडला नसेल किंवा प्रश्न पडलाही असेल तर त्याचं उत्तर माहीत नसेल.
रनिंग शूजमधील खास गोष्ट
जास्तीत जास्त लोक शूज वापरतात. काही लोकांकडे तर वेगवेगळ्या प्रकारचे शूज असतात. फिटनेस फ्रिक लोकांकडे तर स्पोर्ट्स शूजही असतात. आपल्याकडेही स्पोर्ट्स शूज असतील तर लेस बांधण्याच्या जागेकडे बारकाईने पाहिलंय का? लेस असलेल्या पोर्शनला जर आपण बारकाईने पाहिलं असेल तर दिसतं की, लेस बांधण्यासाठी एक एक्स्ट्रा होल दिलेलं आहे. जे सगळ्यात वरच्या बाजूला असलेल्या छिद्राच्या खाली असतं. आपल्याला माहीत आहे का की, हे एक्स्ट्रा छिद्र कशासाठी दिलेलं असतं? चला जाणून घेऊ.
एक्स्ट्रा शूलेस होल कशासाठी?
ज्या एक्स्ट्रा शूलेसबाबत सांगतोय त्याला हील लॉक किंवा मग रनर लॉक बनवण्यासाठी दिलं जातं. हे देण्यामागचं कारणही खास आहे. हे एक्स्ट्रा होल टाचेला शूजमध्ये चांगल्याप्रकारे लॉक करण्यासाठी दिलं जातं. जेणेकरून धावताना किंवा चालताना टाच शूजमधून बाहेर येऊ नये किंवा पुन्हा पुन्हा वर येऊ नये. त्यासोबतच या होलमुळे पायाला खरचटणं किंवा फोडही टाळलं जातं. जेव्हा शूज घातल्यावर तो सैल राहतो आणि पुन्हा पुन्हा टाच वरखाली होत राहते तेव्हा घर्षणामुळे पायाला इजा होऊ शकते. पण एक्स्ट्रा होलमुळे असं होत नाही. त्याशिवाय याचं आणखी एक कारण सांगितलं जातं की, जर शूजची लेस जास्त लांब असेल तर या एक्स्ट्रा होलचा वापर करता येतो.