टीव्हीच्या रिमोटमध्ये लाल, हिरव्या, पिवळ्या आणि निळ्या रंगाची बटणे कशासाठी असतात? आपल्यालाही नसेल माहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:48 IST2026-03-05T14:48:10+5:302026-03-05T14:48:50+5:30

Interesting Facts About TV Remote : आज आम्ही आपल्याला रिमोटबाबत एक खास बाब सांगणार आहोत, जी क्वचितच काही लोकांना माहीत असेल. 

Why do remotes have red, green, yellow and blue buttons? You may not know either | टीव्हीच्या रिमोटमध्ये लाल, हिरव्या, पिवळ्या आणि निळ्या रंगाची बटणे कशासाठी असतात? आपल्यालाही नसेल माहीत

टीव्हीच्या रिमोटमध्ये लाल, हिरव्या, पिवळ्या आणि निळ्या रंगाची बटणे कशासाठी असतात? आपल्यालाही नसेल माहीत

Interesting Facts About TV Remote : हल्ली फोनच्या वाढलेल्या वापराबाबत नेहमीच चर्चा होत असते. बस, ट्रेन, कार, विमान कुठे प्रवास करताना, कोणतंही काम करताना, रिकामे असताना लोक सतत फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात. फोनशिवाय त्यांना जराही चैन पडत नाही. असं असलं तरी मनोरंजनासाठी टीव्हीचं महत्व काही कमी झालेलं नाही. पूर्वी मोजक्याच घरांमध्ये टीव्ही असायचे, पण आता घराघरात टीव्हीने जागा मिळवली आहे. मोकळ्या वेळात लोक टीव्ही बघणं पसंत करतात. आपणही टीव्ही बघत असालच. लोक आपापल्या आवडीने कार्यक्रम बघतात. मुद्दा असा आहे की, टीव्ही सगळेच बघतात आणि जेव्हा टीव्ही बघता तेव्हा रिमोटच्या इतक्या साऱ्या बटणांकडेही लक्ष जात असेलच. पण आज आम्ही आपल्याला रिमोटबाबत एक खास बाब सांगणार आहोत, जी क्वचितच काही लोकांना माहीत असेल. 

रिमोटची बटणे आणि त्यांचं रहस्य

आपण पाहिलं असेल की, टीव्हीच्या लांबलचक रिमोटवर वेगवेगळी बटणे असतात. बऱ्याच बटणांवर लिहिलेलं असतं की, ते कशासाठी वापरायचे आहेत. सामान्यपणे कोणत्याही रिमोटमध्ये लोक ऑन-ऑफ, आवाज कमी जास्त करणे आणि चॅनल बदलण्यासाठी नंबर असलेल्या बटणांचा अधिक वापर करतात. पण आपण पाहिलं असेल की, रिमोटमध्ये चार अशी बटणे असतात ज्यांचा उपयोग काय हे अनेकांना माहीत नसतं. रिमोटमध्ये लाल, पिवळे, हिरवे आणि निळ्या रंगाची बटणे असतात. आपल्याला सुद्धा ही बटणे पाहून अनेकदा यांबाबत प्रश्न पडला असेल. तेच आज जाणून घेऊया.

रिमोटमध्ये ही बटणे का असतात? 

ही रंगीबेरंगी बटणे रिमोटमध्ये का असतात? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीत नसेल पण जे जुने टीव्ही होते त्यांच्या रिमोटमध्ये ही बटणे टेलीकास्ट सर्व्हिससाठी दिले जात होते. जुन्या टीव्हीच्या रिमोटमध्ये या बटणांनी एक वेगळा मेन्यू उघडला जात होता. आता आपण हे जाणून घेऊया की, सेट - टॉप बॉक्सच्या रिमोटमध्ये ही बटणे का असतात. सेट - टॉप बॉक्सच्या रिमोटमध्ये ही बटणे भाषा बदलण्यासाठी किंवा एखादी सेवा सुरू करण्यासाठी किंवा रेकॉर्डिंग लॉक करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी कामात येतात. तेच स्मार्ट टीव्हीबाबत सांगायचं तर स्मार्ट टीव्हीच्या रिमोटमध्ये हे बटणे मेन्यूमध्ये आणि अॅप-स्पेसिफिक फंक्शन नॅव्हिगेट करण्यासाठी असतात.

Web Title : टीवी रिमोट के रंगीन बटन: लाल, हरा, पीला, नीला किस काम के?

Web Summary : टीवी रिमोट में लाल, हरा, पीला, नीला बटन टेलीकास्ट सर्विस, भाषा विकल्प, रिकॉर्डिंग या ऐप नेविगेशन के लिए होते हैं, जो टीवी के प्रकार पर निर्भर करता है। कई लोग इनके विशिष्ट कार्यों से अनजान हैं।

Web Title : TV remote's colored buttons: What are red, green, yellow, blue for?

Web Summary : TV remotes have colored buttons (red, green, yellow, blue) for telecast services, language options, recording, or app navigation, depending on the TV type. Many are unaware of their specific functions.