दारू पिण्याआधी काही थेंब खाली का शिंपडतात लोक? पाहिलं तर असेलच, पण माहीत नसेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:59 IST2026-02-03T12:50:05+5:302026-02-03T12:59:36+5:30

Interesting Facts : अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवल्या असतील, ज्या आपल्याला कधीतरी खटकल्या असतील. पण त्याबाबत माहिती नसेल. अशाच एका गोष्टीबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Why do people sprinkle a few drops of alcohol before drinking? Know the real reason | दारू पिण्याआधी काही थेंब खाली का शिंपडतात लोक? पाहिलं तर असेलच, पण माहीत नसेल उत्तर

दारू पिण्याआधी काही थेंब खाली का शिंपडतात लोक? पाहिलं तर असेलच, पण माहीत नसेल उत्तर

Interesting Facts : कितीतरी अशा गोष्टी असतात, ज्या आपण रोज करतो किंवा बघत असतो. पण त्या गोष्टींचं कारण आपल्याला माहीत नसतं. इतकंच नाही तर त्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही. बऱ्याचदा तर काही गोष्टींना फॅशन किंवा ट्रेंड समजला जातो आणि इथेच त्या गोष्टीचं कारण जाणून घेण्याची जिज्ञासा संपते. आपल्यासोबत देखील अनेकदा असं काही झालं असेल. अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवल्या असतील, ज्या आपल्याला कधीतरी खटकल्या असतील. पण त्याबाबत माहिती नसेल. अशाच एका गोष्टीबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

दारू पिण्याआधी काही थेंब का शिंपडतात?

आपण अनेक सिनेमांमध्ये किंवा प्रत्यक्षात पाहिलं असेल. काही लोक ग्लासमध्ये बोट घालून दारूचे काही थेंब जमिनीवर टाकतात किंवा हवेत उडवतात. पण असं नेमकं का केलं जातं, हे फारच कमी लोकांना माहीत असतं.

यामागचं कारण काय?

दारू पिण्यापूर्वी काही थेंब शिंपडण्याची प्रथा पूर्वजांना किंवा दिवंगत आत्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केली जाते, असं मानलं जातं. ही पद्धत फार जुन्या काळापासून चालत आली आहे. या प्रथेला “लिबेशन” (Libation) असं म्हणतात. अनेक संस्कृतींमध्ये पहिली ड्रिंक पूर्वजांना अर्पण करण्याची ही परंपरा आहे. काही लोक याला नशीब चांगलं राहावं किंवा वाईट शक्ती दूर राहाव्यात यासाठीचा उपाय मानतात.

वैज्ञानिक कारण आहे का?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण नाही. ही कृती पूर्णपणे लोकांच्या श्रद्धा, परंपरा किंवा अंधश्रद्धांशी संबंधित आहे. आजच्या काळात अनेक लोक फक्त ट्रेंड म्हणूनही हे फॉलो करताना दिसतात.

Web Title : लोग शराब पीने से पहले कुछ बूंदें क्यों गिराते हैं?

Web Summary : शराब पीने से पहले कुछ बूंदें गिराना पूर्वजों या दिवंगत आत्माओं को सम्मान देने की प्रथा है, जिसे "लिबेशन" कहा जाता है। कुछ लोग इसे भाग्य लाने या बुरी शक्तियों को दूर करने का उपाय मानते हैं। इसका कोई वैज्ञानिक कारण नहीं है; यह आस्था और परंपरा पर आधारित है।

Web Title : Why do people spill a few drops of alcohol?

Web Summary : Spilling alcohol honors ancestors or departed souls, a tradition called "Libation." Some believe it brings good luck or wards off evil. No scientific reason exists; it's based on faith and tradition.