शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

दु:खात अश्रू येणं समजू शकतं, पण आनंदात डोळ्यातून अश्रू का येत असतील बरं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:36 IST

आवडत्या व्यक्तीसोबत लग्नाचा दिवस असो वा एखादी खूप जास्त आवडती वस्तू मिळण्याचा दिवस असो. अनेकांनी आनंदाचे अश्रू अनुभवले असतील.

आवडत्या व्यक्तीसोबत लग्नाचा दिवस असो वा एखादी खूप जास्त आवडती वस्तू मिळण्याचा दिवस असो. अनेकांनी आनंदाचे अश्रू अनुभवले असतील. तुम्ही दु:खात अश्रू येत असल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. एकवेळ हे दु:खात डोळ्यात अश्रू येणं समजूही शकतं. पण आनंदाच्या क्षणी डोळ्यात अश्रू कसे येतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. अनेकांना तर हा विचित्रपणा वाटत असेलही, पण विज्ञान सांगतं की, असं होणं नॉर्मल आहे.

(Image Credit : independent.co.uk)

Fatherly या वेबसाइटसोबत बोलताना मानसोपचार तज्ज्ञ Oriana R Aragon यांनी सांगितले की, मनात सकारात्मक भावना आल्यानंतरही काही लोकांच्या चेहऱ्यावर नकारात्मक हावभाव बघायला मिळतात. Oriana R Aragon यांनी २०१५ मध्ये Happy Tears वर केलेल्या रिसर्चमधून ही गोष्टी समोर आली आहे.

तर एका दुसऱ्या रिसर्टमधून असं आढळून आलं की, आनंदाच्या अश्रूंसाठी चांगली बिर्याणी किंवा आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणंच अनिवार्य नाही. त्यासाठी व्यक्तीमध्ये भावना असणं गरजेचं आहे.

(Image Credit : fatherly.com)

Psychology Today च्या एका रिपोर्टनुसार, मेंदूतील Hypothalamus आनंद किंवा दु:खं, टेन्शन किंवा ओव्हरएक्साइटमेंटमध्ये फरक करू शकत नाही. Hypothalamus जवळ  Amygdala तून Neural Signal जातो आणि त्याला केवळ हेच माहीत असतं की, त्याला Autonomic Nervous System (Involuntary Nervous System)  अॅक्टिवेट करायची आहे.

Autonomic Nervous System चे दोन भाग

Sympathetic - 

Sympathetic Nervous System आपल्या शरीराला स्ट्रेस दरम्यान मोबिलाइज म्हणजे एकत्र करतो. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. आपल्याला घाम येऊ लागतो आणि काही लोकांना तर जोरदार भूकही लागते.

(Image Credit : fatherly.com)

Parasympathetic

Parasympathetic Nervous System आपल्याला शांत करते. त्यासोबतच या सिस्टीममध्ये काही विचित्र घटनाही घडतात. ही सिस्टीम Tear Duct सोबत कनेक्ट असते. Neurotransmitter Acetycholine ने Parasympathetic Nervous System, अॅक्टिवेशन केल्यावर डोळ्यातून अश्रू येतात. नाक वाहू लागतं.

Miceli आणि Castelfranchi ची एक थेअरी सांगते की, इमोशनल अश्रू हे लाचारी किंवा काहीच करू न शकण्याच्या स्थितीतही येतात. मग तो तणाव असो वा आनंदाची बातमी असो. हा एक कंट्रोल न ठेवता येणाऱ्या स्थितीसारखा रिफ्लेक्स रिस्पॉन्स आहे.

टॅग्स :ResearchसंशोधनPersonalityव्यक्तिमत्वInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स