इस्त्राइलमधील पुरूष घालतात त्या टोपीला काय म्हणतात, काय असतं या खास टोपीचं महत्वं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:30 IST2026-03-02T12:07:56+5:302026-03-02T12:30:54+5:30
Interesting Facts : इस्त्राइलमधील पुरूष आपल्या कपड्यांसोबत एक वेगळीच टोपी घालतात. ही टोपी वेगळी आणि आकर्षक असते. पण येथील लोक ही टोपी का घालतात आणि तिला काय म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत.

इस्त्राइलमधील पुरूष घालतात त्या टोपीला काय म्हणतात, काय असतं या खास टोपीचं महत्वं?
Interesting Facts : जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील लोकांची वेशभूषा वेगळी आणि अनोखी असते. काही देशांमध्ये लोकांचे कपडे फारच वेगळे असतात. चीनमध्ये महिलांना आपण लाल रंगाच्या गाउनमध्ये बघितलं असेल. अरब देशांमध्ये महिला वेगळ्याच काळ्या कपड्यांमध्ये दिसतात. याप्रमाणे इस्त्राइलमधील पुरूष आपल्या कपड्यांसोबत एक वेगळीच टोपी घालतात. ही टोपी वेगळी आणि आकर्षक असते. पण येथील लोक ही टोपी का घालतात आणि तिला काय म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत.
इस्त्राइलमध्ये कसे कपडे वापरतात?
रिपोर्ट्सनुसार, तेल अवीव हे इस्त्राइलमधील सगळ्यात धर्मनिरपेक्ष शहर आहे. इथे जास्तीत जास्त लोक फॉर्मल आणि कॅज्युअल कपडे वापरतात. अनेक महिला बीचवर जातात, सोबतच ऑफ शोल्डर ड्रेसही घालतात. इस्त्राइलमध्ये पुरूष कॅज्युअल आणि आरामदायक कपडे वापरतात. ज्यात टी-शर्ट, जीन्स, शॉर्ट्स आणि सॅंडल कॉमन आहे. उन्हाळ्यात हे लोक सूती आणि लिननचे कपडे वापरतात. तर धार्मिक स्थळांमध्ये कांधे आणि गुडघे झाकलेले असणं गरजेचं आहे.
Hello कसं म्हणतात?
इस्त्राइलमध्ये अभिवादन फारच खास केलं जातं. एखाद्या नव्या व्यक्तीला भेटल्यावर हँडशेक केलं जातं, तर जवळचे मित्र किंवा परिवार एकमेकांना मिठी मारून किंवा गालावर किस करून अभिवादन करतात. Hello ऐवजी इथे हिब्रूमध्ये 'शालोम' म्हणतात, ज्याचा अर्थ शांति आणि कल्याणाचा आशीर्वाद आहे.
खास टोपीला काय म्हणतात?
इस्त्राइलमध्ये रूढिवादी ज्यू पुरूष जी टोपी घालतात, तिला 'यार्मुल्के (किप्पा)' म्हणतात. ही टोपी डोक्याच्या वरच्या भागावर घातली जाते. बशीसारखी दिसणारी ही टोपी स्थिर रहावी म्हणून हेअर क्लिपचा वापर केला जातो. डबल सायडेड फॅशन टेप किंवा एका बाजूला वेल्क्रोचा एक छोटा तुकडा लावून ही घातली जाते. ही टोपी येथील पुरूष देवाप्रति सन्मान आणि श्रद्धा दाखवण्यासाठी घातली जाते. काही लोक ही टोपी नेहमीच घालतात, तर काही लोक प्रार्थना करताना, धार्मिक कार्यावेळी किंवा आशीर्वाद देताना घालतात.