कुत्रे जीभ बाहेर काढून का बसलेले असतात? कारण असं जे तुम्हालाही नसेल माहीत....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:58 IST2026-03-21T14:56:40+5:302026-03-21T14:58:09+5:30
Interesting Facts : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कुत्रे जीभ बाहेर काढून सतत श्वास घेत असतात. पण ते असं का करतात, हे तुम्हाला माहिती आहे का? चला यामागचं कारण जाणून घेऊया.

कुत्रे जीभ बाहेर काढून का बसलेले असतात? कारण असं जे तुम्हालाही नसेल माहीत....
Interesting Facts : कुत्र्यांना माणसाचा सर्वात विश्वासू साथीदार मानलं जातं. ज्या घरात कुत्रा पाळला जातो, त्याला घरातील सदस्यासारखंच मानलं जातं. हा प्राणी इतका खास असतो की त्याच्याशी जिव्हाळा निर्माण होणे स्वाभाविक आहे. मालकाबद्दलची त्याची निष्ठा आणि प्रेम कोणाच्याही मनात त्याच्यासाठी खास स्थान निर्माण करते. मात्र हा बोलू न शकणारा प्राणी आपली निष्ठा तर दाखवतो, पण त्याला होणाऱ्या समस्या तो शब्दांत सांगू शकत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कुत्रे जीभ बाहेर काढून सतत श्वास घेत असतात. पण ते असं का करतात, हे तुम्हाला माहिती आहे का? चला यामागचं कारण जाणून घेऊया.
कुत्रे जीभ बाहेर काढून का हांफतात?
कुत्र्यांचं शरीर माणसांच्या शरीरापेक्षा वेगळं असतं आणि त्यांच्या शरीरातील अनेक प्रक्रिया देखील वेगळ्या असतात. उन्हाळ्यात आपल्याला उष्णता जाणवली की शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपल्या शरीरातून घाम येतो. आपल्या त्वचेखाली असलेल्या स्वेट ग्लँड्स घाम निर्माण करतात.
पण कुत्र्यांच्या शरीरात अशा प्रकारच्या घामग्रंथी जवळजवळ नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान घामाद्वारे कमी होत नाही. म्हणूनच ते जीभ बाहेर काढून आणि सतत श्वास घेऊन शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतात. खासकरून उन्हाळ्यात कुत्रे अधिक अशी क्रिया करताना दिसतात.
पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आवश्यक
कधी कधी पाळीव प्राण्यांच्या वेगळ्या वागणुकीकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या मुक प्राण्यांच्या वागण्यातील संकेत समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
वागण्यातील बदलांकडे दुर्लक्ष करू नका
जर तुमच्या पाळीव प्राण्याच्या वागण्यात अचानक बदल दिसला तर ताबडतोब पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच तुमचा पाळीव प्राणी कोणत्या परिस्थितीत कसे वागतो, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. साधारणपणे कुत्र्यांना उष्णता जास्त जाणवते, खासकरून युरोपीय जातींच्या कुत्र्यांना उष्णतेचा त्रास अधिक होतो. त्यामुळे शक्य तितके थंड आणि आरामदायी वातावरण त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.