नव्या गाडीच्या चावीसोबत दिला जातो एक मेटल टॅग, पण त्याचं नेमकं काम काय असतं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:01 IST2026-03-20T16:00:03+5:302026-03-20T16:01:12+5:30

Interesting Facts : एक अशी गोष्ट असते जी नवीन बाइक किंवा कार खरेदी करताना आपल्याला मिळते, पण अनेकांना त्याबाबत माहिती नसते.

Why do bike and car keys come with metal tag, know its work | नव्या गाडीच्या चावीसोबत दिला जातो एक मेटल टॅग, पण त्याचं नेमकं काम काय असतं? जाणून घ्या

नव्या गाडीच्या चावीसोबत दिला जातो एक मेटल टॅग, पण त्याचं नेमकं काम काय असतं? जाणून घ्या

Interesting Facts : हल्ली एका घरात तब्बल २ ते ३ गाड्या आरामात असतात. पूर्वी गावातील मोजक्याच लोकांकडे गाडी असायची. जी बघायला लोक गर्दी करायचे. पण आता गाड्यांची संख्या खूप जास्त झाली आहे. कुणी कार वापरतं तर कुणी बाइक. काही लोकांकडे तर कार आणि बाइक दोन्ही प्रकारच्या गाड्या असतात. आपल्या स्वत:च्या गाडीने ऑफिस किंवा बाहेर फिरायला जाणं अनेकांना आवडतं. एकतर आपल्या सोयीनुसार निघता येतं आणि आरामात प्रवासही होतो. ज्यांच्याकडे कार किंवा बाइक असते, त्यांना त्यांच्या गाडीबाबत बरीच माहिती असते. पण एक अशी गोष्ट असते जी नवीन बाइक किंवा कार खरेदी करताना आपल्याला मिळते, पण अनेकांना त्याबाबत माहिती नसते. 

चावीसोबत काय मिळतं?

नव्या गाडीची चावी मिळण्याचा आनंद काही औरच असतो. पण आपण कधी लक्ष दिलंय का की, जेव्हा नवीन गाडी चावी दिली जाते, तेव्हा चावीसोबत आणखी एक गोष्ट मिळते. दोन चाव्यांसोबत एक मेटल टॅग मिळतो. या मेटल टॅगवर एक नंबर लिहिलेला असतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हा मेटल टॅग का दिला जातो. शोरूममधून गाडी घरी नेताना तिथे आपण याबाबत विचारही नाही आणि ते लोक सांगतही नाहीत. तर हा मेटल टॅग काय असतो, कशासाठी असतो हेच आज आपण पाहणार आहोत.

कशासाठी असतो मेटल टॅग?

कार किंवा बाइकसोबत जी चावी दिली जाते, त्यासोबत एक मेटल टॅगही असतो. जो फार महत्वाचा असतो. मेटल टॅग चाव्यांसोबतच दिला जातो. आता समजा की, आपल्या गाडीच्या दोन्ही चाव्या हरवल्या तर आपल्याला पूर्ण लॉक सिस्टीम बदलावं लागेल. पण जर हा मेटल टॅग आपल्याकडे असेल तर आपल्याला पूर्ण लॉक सिस्टीम बदलण्याची गरज पडणार नाही. कारण या टॅगचा वापर करून आपण आपल्या गाडीसाठी नवीन आणि ओरिजनल चावी बनवू शकता. हा टॅग मुळात आपल्या वाहनाच्या चावीचा एक डिजिटल फिंगरप्रिंट असतो आणि शोरूममध्ये हा टॅग देऊन नवीन चावी बनवली जाऊ शकते. असं केल्याने आपले पैसेही वाचतील आणि वेळही.

Web Title : नई गाड़ी की चाबी का मेटल टैग: जानिए इसका उद्देश्य, पैसे बचाएं!

Web Summary : नई गाड़ी की चाबियों के साथ एक मेटल टैग आता है। यह टैग सभी चाबियाँ खो जाने पर नई चाबी बनाने में मदद करता है, जिससे महंगी लॉक सिस्टम बदलने से बचा जा सकता है। यह आपकी चाबी का डिजिटल फिंगरप्रिंट है, जो समय और पैसा बचाता है।

Web Title : New car key metal tag: Purpose revealed, saves money!

Web Summary : New car keys come with a metal tag. This tag helps create a new key if all keys are lost, avoiding costly lock system replacements. It's your key's digital fingerprint, saving time and money.