काही बिस्किटांवर छिद्र असण्याचं काय असतं कारण? यांना डिझाइन समजत असाल तर चुकताय, पाहा नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:20 IST2026-01-17T13:19:50+5:302026-01-17T13:20:24+5:30
Biscuits Holes Facts : आपण पाहिलं असेल की, काही बिस्किटांवर भरपूर छिद्र असतात. पण कधी विचार केलाय का की, ही छिद्र का आणि कशासाठी असतात?

काही बिस्किटांवर छिद्र असण्याचं काय असतं कारण? यांना डिझाइन समजत असाल तर चुकताय, पाहा नेमकं कारण
Biscuits Holes Facts : बऱ्याच लोकांना मग त्यात लहान मुले सुद्धा आलीत, यांना सकाळी किंवा सायंकाळी चहासोबत बिस्किटं खाण्याची सवय असते. अनेकांना तर बिस्किटांशिवाय जातही नाही. बरेच लोक तर ऑफिसमध्ये काम करता करताही बिस्किटं किंवा कुकीज खात राहतात. तर काही लोक प्रवासात बिस्किटं खातात. म्हणजेच काय तर बिस्किटं हे अनेकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग असतात.
आता बिस्किटांचा विषय निघालाच आहे, तर आज आम्ही आपल्याला बिस्किटांबद्दल अशी एक माहिती देणार आहोत, जी कदाचित आजवर कुणीही सांगितलेली नसेल. आपण पाहिलं असेल की, काही बिस्किटांवर भरपूर छिद्र असतात. पण कधी विचार केलाय का की, ही छिद्र का आणि कशासाठी असतात? चला तर वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया.
बिस्किटांमध्ये छिद्र का असतात?
तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या बिस्किटांवर छिद्र नसतात, पण अनेक बिस्किटांवर लहान लहान छिद्र असतात. या छिद्रांना ‘डॉकिंग होल्स’ असे म्हणतात. बिस्किटांवर छिद्र असण्याचं कारण फारच महत्वाचं आणि खास आहे. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की, ही छिद्र डिझाइनसाठी असतात. पण असं नाहीये.
बिस्किट बेक करताना त्यामधील वाफ आणि हवा बाहेर पडावी, यासाठी ही छिद्र तयार केली जातात. त्यामुळे बिस्किट फुगत नाहीत, चपटे राहतात आणि योग्य प्रकारे खारट व कुरकुरीत बनतात. या छिद्रांमुळे बिस्किटं कच्ची राहत नाहीत आणि त्यांना योग्य आकार मिळतो. अशी छिद्रे प्रामुख्याने क्रॅकर्स आणि नमकीन बिस्किटांमध्ये दिसून येतात.
गोड बिस्किटांमध्येही छिद्र असतात का?
बहुतेक वेळा छिद्र असलेली बिस्किटे ही क्रॅकर्स किंवा नमकीन प्रकारातीलच असतात. कारण या बिस्किटांमध्ये ओलावा जास्त असतो. गोड बिस्किटांच्या बाबतीत मात्र वेगळी रचना असते. या बिस्किटांमध्ये छिद्र फारच कमी असतात किंवा अजिबात नसतात, कारण ती थोडी मऊ असतात आणि त्यांची लेयर वेगळ्या पद्धतीने तयार केली जाते.