डोळ्यातील अश्रू आणि शरीराच्या घामाची चव खारट का असते, शरीरात मीठ तयार होतं का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:23 IST2026-03-05T12:23:19+5:302026-03-05T12:23:46+5:30

Salty Sweat and Tears : आपल्याला सुद्धा अनेकदा प्रश्न पडला असेल की, घाम आणि आपल्या अश्रूंची चव ही खारट कशी होते? जाणून घेऊ याबाबत... 

Why are tears and sweat test salty, you should know the reason | डोळ्यातील अश्रू आणि शरीराच्या घामाची चव खारट का असते, शरीरात मीठ तयार होतं का? जाणून घ्या

डोळ्यातील अश्रू आणि शरीराच्या घामाची चव खारट का असते, शरीरात मीठ तयार होतं का? जाणून घ्या

Salty Sweat and Tears : आपल्याला माहीत असेलच की, आपले अश्रू आणि घामाची टेस्ट खारट असते. पण हा खारटपणा अचानक तयार होत नाही. मुळात ही प्रक्रिया या गोष्टीवर अवलंबून असते की, मनुष्याचं शरीर कसं बॅलन्स ठेवतं, टेम्प्रेचर कसं कंट्रोल करतं आणि आवश्यक अवयवांची रक्षा करतं. आपल्याला सुद्धा अनेकदा प्रश्न पडला असेल की, घाम आणि आपल्या अश्रूंची चव ही खारट कशी होते? जाणून घेऊ याबाबत... 

अश्रू आणि घामाची चव खारट का?

आपले अश्रू आणि घामाची चव खारट असण्याचं मुख्य कारण आहे सोडिअम क्लोराइड. याला सामान्यपणे मीठ म्हटलं जातं. सोडिअमसोबतच यात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे इलेक्ट्रोलाइट्सही असतात. हे मिनरल्स फ्यूइड बॅलन्स ठेवण्यास, नर्व सिग्नलला सपोर्ट करण्यास आणि स्नायूंचं काम सुरळीत होण्यासाठी गरजेचे असतात. खरंतर आपले अश्रू आणि घाम आपल्या ब्लट स्ट्रीमशी संबंधित फ्लूइडमधून निघतात. यामुळे त्यांमध्ये खारट चव येते.

अश्रूंमध्ये काय काय असतं?

अश्रू हे जवळपास ९८ टक्के पाण्यापासून बनलेले असतात. बाकी त्यात मीठ, प्रोटीन आणि तेल असतं. प्रत्येक अश्रूत थोडं मीठ असतं, जे बॅक्टेरिअल इन्फेक्शनला रोखण्यास मदत करतं. तर दुसरीकडे घामाच्या ग्रंथि रक्तातून पाणी आणि मीठ काढतात. शरीराचं तापमान वाढलं की, त्वचेतून घाम बाहेर काढला जातो. जेव्हा घाम वाफ बनून उडतो, तेव्हा शरीर थंड होतं. 

शरीरात मीठ तयार होत नाही

मनुष्याच्या शरीरात नॅचरल मीठ तयार होत नाही. त्याऐवजी मीठ रोजचा आहार आणि पाणीद्वारे शरीरात जातं. हे मीठ इलेक्ट्रोलाइट्समध्ये मिक्स होतं. नंतर रक्त आणि शरीरातील इतर द्रव्यात फिरतं. हे इलेक्ट्रोलाइट्स हायड्रेशन कायम ठेवण्यात, ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यास, नसा आणि स्नायूंमध्ये कम्युनिकेशनला सपोर्ट करण्यास मदत करतात. 

व्यक्तीच्या शरीरात किती मीठ असतं?

एक निरोगी व्यक्तीच्या शरीरात साधारण २२५ ग्रॅम मीठ असतं. हे मीठ रक्त, टिश्यू आणि सेल्समधील फ्लूइडमध्ये असतं. हे फ्लूइड शरीरात वेगवेगळ्या भूमिका बजावतं. जेव्हा शरीरात मिठाचं प्रमाण जास्त वाढतं, तेव्हा किडनी जास्त मीठ फिल्टर करून लघवीतून बाहेर काढते. काही मीठ अश्रू आणि घामातून बाहेर पडतं. 

Web Title : आँसू और पसीने का स्वाद नमकीन क्यों: शरीर के नमक के रहस्य

Web Summary : आँसू और पसीने का स्वाद सोडियम क्लोराइड और इलेक्ट्रोलाइट्स के कारण नमकीन होता है। ये तरल पदार्थ रक्त से उत्पन्न होते हैं, जो द्रव संतुलन बनाए रखते हैं और तंत्रिका और मांसपेशियों के कार्य का समर्थन करते हैं। शरीर नमक का उत्पादन नहीं करता, बल्कि आहार से प्राप्त करता है, जिसे किडनी, पसीने और आँसुओं के माध्यम से नियंत्रित किया जाता है।

Web Title : Why Tears and Sweat Taste Salty: The Body's Salt Secrets

Web Summary : Tears and sweat taste salty due to sodium chloride and electrolytes. These fluids originate from blood, maintaining fluid balance and supporting nerve and muscle function. The body doesn't produce salt but obtains it from diet, regulating it through kidneys, sweat, and tears.