विमानाचा रंग पांढराच का असतो माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 11:08 IST2019-12-23T11:00:35+5:302019-12-23T11:08:14+5:30
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, जास्तीत जास्त विमानांचां रंग हा पांढराच का असतो? कदाचित पडलाही असेल. तर आज आम्ही तुम्हाला विमानाचा रंग पांढरा का असतो हे सांगणार आहोत.

विमानाचा रंग पांढराच का असतो माहीत आहे का?
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, जास्तीत जास्त विमानांचां रंग हा पांढराच का असतो? कदाचित पडलाही असेल. तर आज आम्ही तुम्हाला विमानाचा रंग पांढरा का असतो हे सांगणार आहोत. विमानाच रंग पांढरा असण्याला वेगवेगळी कारणे असतात. यामागे वैज्ञानिक आणि आर्थिक अशी कारणे असतात. चला जाणून घेऊ ही कारणे....
विमान गरम होत नाही
विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे याने विमान गरम होत नाही. विमान सतत उन्हात राहतात मग ते रनवेवर असोत वा आकाशात. विमानांवर सूर्याची किरणे थेट पडतात, या किरणांमध्ये इंफ्रारेड रेज असतात. ज्यामुळे भरपूर गरमी निर्माण होते. अशात पांढरा रंग विमानाला गरमीपासून वाचवतो. पांढरा रंग हा चांगला रिफ्लेक्टर असतो. याने सूर्याची किरणे ९९ टक्के रिफ्लेक्ट केली जातात.
काही समस्या असेल तर
पांढऱ्या रंगात कशाप्रकारचाही डेंट किंवा क्रॅक असेल तर सहजपणे दिसून येतो. पण पांढऱ्याऐवजी विमानाला दुसरा कोणताही रंग असेल तर या गोष्टी दिसणार नाही. अशात विमानाचं निरीक्षण करण्यातही पांढरा रंग फायदेशीर असतो.
लवकर दिसतो
दुसऱ्या रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाची व्हिजिबिलीटी जास्त असते. आकाशात पांढरा रंग सहजपणे पाहिला जाऊ शकतो. त्यामुळे अपघात होण्याचा धोकाही कमी असतो.
पांढऱ्या रंगाचं वजन
इतर रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचं वजन कमी असतं. त्यामुळे जेव्हा विमानाला पांढरा रंग दिला जातो, तेव्हा रंगामुळे विमानाचं वजन वाढत नाही. इतर कोणत्याही रंगामुळे विमानाचं वजन वाढू शकतं.
आर्थिक कारणे
तज्ज्ञांनुसार, पांढऱ्या रंगाच्या विमानाची रिसेल व्हॅल्यू अधिक असते. त्यासोबतच विमान सतत उन्हात राहत असल्याने दुसरा कोणताही रंग खराब होण्याचा धोका अधिक राहतो. पण पांढरा रंग लवकर खराब होत नाही. त्यामुळे विमानाला पुन्हा पुन्हा पेंट करावं लागत नाही.