विमानाच्या खिडक्या चौकोनी नाही तर गोलाकार का असतात? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:01 IST2025-06-24T15:49:00+5:302025-06-24T16:01:47+5:30

Airplane Window : तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाची खिडकी गोल किंवा अंडाकृती आकाराचीच का असते? याचंच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Why airplane windows are round the fascinating science explained | विमानाच्या खिडक्या चौकोनी नाही तर गोलाकार का असतात? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

विमानाच्या खिडक्या चौकोनी नाही तर गोलाकार का असतात? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Airplane Window : विमानात प्रवास करणार असाल तर खिडकी जवळची जागा मिळावी असं सगळ्यांनाच वाटतं. कारण खिडकीत बसून वरचा नजारा बघण्याचा आनंद घ्यायचं असतो. हा अनुभव खरंच नेहमीसाठी स्मरणात राहणारा असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाची खिडकी गोल किंवा अंडाकृती आकाराचीच का असते? याचंच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

प्रेशर उचलण्यास चांगल्या

विमान जेव्हा जमिनीहून हवेत उडतं, तेव्हा बाहेरच्या हवेचा दबाव फार कमी होतो. तर आतील कॅबिनचा दबाव कंट्रोलमध्ये राहतो. हे अंतर प्रत्येक उड्डाणावेळी पुन्हा पुन्हा होतं. गोल खिडक्यांची बनावट या दबावात चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि तुटण्याचा किंवा फुटण्याचा धोका कमी असतो.

भेगा पडण्याचा धोका कमी

विमान जेव्हा फार जास्त उंचीवर उडतं, तेव्हा त्याच्या एकूणच स्ट्रक्चरवर खूप जास्त दबाव पडत असतो. जर खिडक्या चौकोनी असतील तर त्यांच्या कोपऱ्यावर हा दबाव जास्त राहतो आणि तिथून भेगा पडण्याचा धोका जास्त असतो. गोल खिडक्या हा दबाव बरोबरीत विभागतात. ज्यामुळे विमानाची संरचना सुरक्षित राहते.

जास्त काळ टिकतात

विमानाच्या स्ट्रक्चरला प्रत्येक उड्डाणावेळी दबाव सहन करावा लागतो. ज्यामुळे काळानुसार मेटल कमजोर होतं. गोल खिडक्यांमुळे हा दबाव कमी प्रभाव टाकतो आणि पूर्ण विमानाची शेल्फ-लाइफ वाढते. ज्यामुळे मेंटेनन्सचा खर्च कमी होतो आणि एअरलाईन्सचा बजेट वाचतो.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या

जर एखाद्या कारणानं विमानाची खिडकी डॅमेज होते, तेव्हा हे प्रवाशांसाठी घातक ठरू शकतं. गोल खिडक्यांची मजबूत बनावट अशा आपात स्थितींमध्ये जास्त सुरक्षित राहते. हे केवळ एक डिझाइन नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे.

सुंदरता आणि आरामाचा संबंध

गोल खिडक्या वैज्ञानिक दृष्टीने तर महत्वाच्या आहेत, सोबतच दिसायलाही आकर्षक दिसतात. त्या विमानाच्या गोल आणि एरोडायनामिक बनावटीसोबत जुळतात. 

Web Title: Why airplane windows are round the fascinating science explained