बाबो! 'या' व्यक्तीच्या कारवर लावली आहे '३४० कोटी रूपयांची' नंबर प्लेट, दुसरी सर्वात महागडी नंबर प्लेट कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:42 IST2022-04-26T13:39:41+5:302022-04-26T13:42:01+5:30
Most Expensive number Plate : मोटरिंग एक्सपोजर मॅगझिनने या नंबर प्लेटला आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट घोषित केलं आहे. अफजलला या नंबर प्लेटसाठी कोट्यावधी रूपयांची ऑफर मिळाली आहे.

बाबो! 'या' व्यक्तीच्या कारवर लावली आहे '३४० कोटी रूपयांची' नंबर प्लेट, दुसरी सर्वात महागडी नंबर प्लेट कोणती?
Most Expensive number Plate : पैसेवाल्या लोकांच्या आवडी-निवडीही तशाच शाही असतात. ते कधी कशावर पैसे खर्च करतील काहीच सांगता येत नाही. महागड्या व्हिआयपी नंबर प्लेट्सची क्रेझ तर सगळ्यांनाच असते. लोक आपल्या आवडीच्या नंबर्ससाठी कोट्यावधी रूपये खर्च करतात. आज आम्ही तुम्हाला जगातली सर्वात महागडी नंबर प्लेट आणि त्याच्या मालकाबाबत सांगणार आहे.
जगातली सर्वात महागडी नंबर प्लेट ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अपजल काह्य नावाच्या कार डिझायनरकडे आहे. त्याने १४ वर्षाआधी 'F1' हा नंबर साधारण ४ कोटी रूपयांना खरेदी केला होता. अफजलच्या वेबसाइटनुसार, तेव्हापासून आतापर्यंत या नंबरची किंमत आता कमालीची वाढली आहे.
मोटरिंग एक्सपोजर मॅगझिनने या नंबर प्लेटला आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट घोषित केलं आहे. अफजलला या नंबर प्लेटसाठी कोट्यावधी रूपयांची ऑफर मिळाली आहे. पण त्याने हा नंबर विकला नाही. ब्रिटनमध्ये नंबर प्लेट विकणं कायदेशीर आहे.
अफजल म्हणाला की जोपर्यंत एखादी मोठी ऑफऱ मिळत नाही तोपर्यंत तो ही नंबर प्लेट विकणार नाही. नंबर प्लेट सप्लायर वेबसाइट Regtransfers वर या नंबर प्लेटची किंमत साधारण ३४२ कोटी रूपये सांगितली आहे. अफजलने ही नंबर प्लेट त्याच्या Bugatti Veyron कारवर लावली आहे.
जगातली दुसरी सर्वात महागडी नंबर प्लेट एक सिंगल डिजीट '1' ही आहे. ही नंबर प्लेट सईद अब्दुल गफ्फार खौरीने जवळपास १०९ कोटी रूपयात खरेदी केली होती. ही नंबर प्लेट त्यांनी एका लिलावातून खरेदी केली होती. खोरी Abdul Khaleq AI Khouri & Bros Co आणि Milipol International Est चे सीईओ आहेत.
जगातली तिसरी सर्वात महागडी नंबर प्लेट दुबईत ७३ कोटी रूपयांना विकली गेली. ही नंबर प्लेट एका व्यक्तीने चॅरिटी लिलावातून खरेदी केली. गाडीचा नंबर AA8 होता.
२०१६ मध्ये ६४ कोटी रूपयांमध्ये जगातली चौथी सर्वात महागडी नंबर प्लेट खरेदी केली गेली. D5 हा नंबर भारतीय बिझनेसमन बलविंदर साहनीने खरेदी केला होता. ते म्हणाले होते की, त्यांना ही नंबर प्लेट हवी होती कारण त्यांचा लकी नंबर ९ आहे आणि D अल्फाबेटमधील चौथ लेटर आहे. अशात ४ आणि ५ मिळून ९ होतात.