अखेर खुलासा झालाच, कुणी उभं केलं होतं इजिप्तमधील पिरॅमिड; रिसर्चमधून नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:17 IST2025-07-07T17:16:20+5:302025-07-07T17:17:31+5:30

Great Pyramid of Giza: आतापर्यंत मानलं जात होतं की, या पिरॅमिडचं निर्माण गुलामांनी केलं असेल. पण आता नव्या शोधातून समोर आलं आहे की, हे काम गुलामांनी केलं नव्हतं. 

Who built great pyramid giza new discovery claims | अखेर खुलासा झालाच, कुणी उभं केलं होतं इजिप्तमधील पिरॅमिड; रिसर्चमधून नवा दावा

अखेर खुलासा झालाच, कुणी उभं केलं होतं इजिप्तमधील पिरॅमिड; रिसर्चमधून नवा दावा

Great Pyramid of Giza: जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक इजिप्तमधील पिरॅमिडबाबत नेहमीच काहीना काही आश्चर्यकारक समोर येत असतं. लोकांना सुद्धा याबाबतच्या गोष्टी जाणून घेण्याची उस्तुकता असते. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत वेगवेगळे शोध केले जात आहेत. इतके विशाल पिरॅमिड बांधले कुणी? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. याबाबत अनेक वर्षांपासून शोध घेतला जात आहे. आतापर्यंत मानलं जात होतं की, या पिरॅमिडचं निर्माण गुलामांनी केलं असेल. पण आता नव्या शोधातून समोर आलं आहे की, हे काम गुलामांनी केलं नव्हतं. 

पुरातत्ववाद्यांनी इजिप्तच्या महान पिरॅमिडच्या आत महत्वाचा शोध घेतला. यातून समोर आलं की, ४ हजार ५०० वर्षाआधी या स्मारकाची निर्माण कुणी केलं होतं. या पिरॅमिडच्या आत काही कबरी मिळाल्या आहेत. ज्या आधारावर हा शोध करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध इजिप्टोलॉजिस्ट डॉ. जाही हवास आणि त्यांची टीम अनेक वर्षांपासून या पिरॅमिडचा अभ्यास करत आहेत. यादरम्यान त्यांना अशा काही गोष्टी आढळून आल्या ज्याद्वारे समजलं की, याचं निर्माण कुणी केलं असेल. याचं बांधकाम गुलामांनी नाही तर अत्यंत कुशल, प्रोफेशनल आणि पगारावर असलेल्य मजुरांनी केलं.

डॉक्टर जाही हवास यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं की, त्यांच्या शोधातून हे स्पष्ट होतं की, गुलामांनी गीजा पिरॅमिड निर्माण केले नाहीत. जर जे गुलाम असते तर त्यांना पिरॅमिडच्या बाजूला दफन केलं नसतं. त्यांच्या कबरींमध्ये त्यांची औजारं ठेवण्यात आली आणि त्यांवर त्यांचे नावही कोरण्यात आले होते. यातून त्यांच्याप्रति शासनाकडून दाखवण्यात आलेला सन्मान दिसून येतो.

ते म्हणाले की, यातून हे समजतं की, हे पिरॅमिन बनवणाऱ्या लोकांचा त्यावेळी शासनापर्यंत संपर्क होता. या नव्या शोधानं आधीच्या दाव्याला नाकारलं. ज्यात गुलामांनी गीजा पिरॅमिड बनवल्याचं म्हटलं होतं. 

Web Title: Who built great pyramid giza new discovery claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.