भारतातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे प्लॅटफॉर्म तिकीट नाही तर पासपोर्ट दाखवून मिळते एन्ट्री, कुठंय हे स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:09 IST2026-01-27T15:07:14+5:302026-01-27T15:09:33+5:30

Railway Interesting Facts: आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथे प्लॅटफॉर्म तिकीट दाखवून नाही तर पासपोर्ट दाखवून एन्ट्री मिळते.

Which railway station gave entry by showing passport not platform ticket | भारतातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे प्लॅटफॉर्म तिकीट नाही तर पासपोर्ट दाखवून मिळते एन्ट्री, कुठंय हे स्टेशन

भारतातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे प्लॅटफॉर्म तिकीट नाही तर पासपोर्ट दाखवून मिळते एन्ट्री, कुठंय हे स्टेशन

Railway Interesting Facts: भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनची आपली एक वेगळी खासियत आहे. या स्टेशन्सचे अनेक किस्से नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. आपल्याला माहीत असेलच की, एखाद्या स्टेशनवर जाण्यासाठी एकतर आपल्याकडे रेल्वेचं तिकीट हवं असतं, नाही तर मग प्लॅटफॉर्म तिकीट हवं असतं. पण आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथे प्लॅटफॉर्म तिकीट दाखवून नाही तर पासपोर्ट दाखवून एन्ट्री मिळते. महत्वाची बाब म्हणजे हे देशातील शेवटचं रेल्वे स्टेशनही होतं आणि सुरक्षेच्या दृष्टीने इथे प्रवाशांचा पासपोर्ट चेक केला जात होता.

भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन

आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन अटारी रेल्वे स्टेशन आहे. जे पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेवर आहे. हे रेल्वे स्टेशन ऐतिहासिक रूपाने समझोता एक्सप्रेससाठी ओळखलं जातं होतं. इथे पाकिस्तानी व्हिसा आणि पासपोर्टची गरज पडत होती. पण आता ही येथील सेवा बंद आहे. इथे सुरक्षा व्यवस्थाही फार होती आणि जर विना कागदपत्र इथे पकडले गेले तर फॉरेन अॅक्टनुसार केसही दाखल होत होती.

का बंद झाली समझोता एक्सप्रेस?

असा दावा केला जातो की, १९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्या शिमला करारादरम्या समझोता एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय झाला. २२ जुलै १९७६ मध्ये अटारी आणि लाहोर दरम्यान ही एक्सप्रेस सुरू झाली. आधी ही एक्सप्रेस रोज होती. पण १९९४ मध्ये आठवड्यातून केवळ दोन दिवस चालवली जात होती. पण २०१९ मध्ये जेव्हा मोदी सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस बंद केली. त्यावेळी भारतीय रेल्वेचे ११ डबे लाहोरमध्ये होतो, जे आजही तिथेच अडकून आहेत. तर पाकिस्तानी रेल्वेचेही १६ डबे आजही भारतातील अटारी रेल्वे स्टेशनवर आहेत.

भारतातील इतर अनोखे स्टेशन

भारतात अनेक रेल्वे स्टेशनची आपली एक वेगळी खासियत आहे. जसे की, वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा हे सगळ्यात लांब नाव असलेलं रेल्वे स्टेशन आहे आणि बांसपानी छोटं नाव आणि प्लॅटफॉर्मसाठी फेमस आहे. तसेच राशिदपुरा खोरी हे रेल्वे स्टेशन गावातील लोकच चालवतात. इथे प्रवाशांना एक वेगळाच अनुभव मिळतो.

Web Title : अटारी: भारतीय रेलवे स्टेशन जहाँ पासपोर्ट से मिलती है एंट्री।

Web Summary : भारत-पाक सीमा पर स्थित अटारी रेलवे स्टेशन पर कभी समझौता एक्सप्रेस के कारण पासपोर्ट जरूरी था। सेवा बंद, कई अनोखे स्टेशन भी हैं।

Web Title : Attari: Indian railway station where passport grants entry, not ticket.

Web Summary : Attari, India's last railway station on the Pakistan border, once required passports for entry due to the Samjhauta Express. Service stopped; unique stations exist.