देशातलं एकुलतं एक रेल्वे स्टेशन, जिथून रेल्वे क्रॉस होताना बंद होतात सगळे लाईट्स; पाहा नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:18 IST2026-02-04T13:17:27+5:302026-02-04T13:18:17+5:30
Railway Amazing Facts : देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे, जिथून रेल्वे क्रॉस होताना, रेल्वेची लाईट बंद होते. हे कोणतं रेल्वे स्टेशन आहे आणि इथे असं का होतं? हेच आपण समजून घेणार आहोत.

देशातलं एकुलतं एक रेल्वे स्टेशन, जिथून रेल्वे क्रॉस होताना बंद होतात सगळे लाईट्स; पाहा नेमकं कारण
Railway Amazing Facts : भारतीय रेल्वेच्या कितीतरी इंटरेस्टिंग गोष्टी सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यात काही रेल्वेसंबंधी कोड्सचा समावेश असतो, तर कधी एखाद्या खास रेल्वे स्टेशनची माहिती असते. देशात कितीतरी रेल्वे अनोखे रेल्वे स्टेशन्स आहेत. ज्यांचं वेगळेपण आम्ही सुद्धा आपल्याला वेळोवेळी सांगत असतो. कारण रेल्वे केवळ प्रवासाचं माध्यम नाही तर देशातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देशात साधारण ७ हजार ३०० ते ७ हजार ५०० च्या जवळपास रेल्वे स्टेशन आहेत. आज आम्ही आपल्याला देशातील एका रेल्वे स्टेशनची एक फारच वेगळी बाब सांगणार आहोत. देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे, जिथून रेल्वे क्रॉस होताना, रेल्वेची लाईट बंद होते. हे कोणतं रेल्वे स्टेशन आहे आणि इथे असं का होतं? हेच आपण समजून घेणार आहोत.
कुठल्या स्टेशनवर येताच ट्रेनची वीज जाते?
सोशल मीडियावर अनेकदा असा दावा केला जातो की तामिळनाडूमधील चेन्नईजवळ असलेले तांबरम रेल्वे स्टेशन हे देशातील एकमेव स्टेशन आहे, जिथे ट्रेन येताच तिची वीज काही क्षणांसाठी बंद होते. हे पाहून प्लॅटफॉर्मवरील प्रवासी आश्चर्यचकित होतात आणि यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण यामागील खरी कारणे तांत्रिक आहेत.
तांबरम स्टेशनवर ट्रेनची वीज का जाते?
खरं तर, तांबरम परिसरात ट्रेनची वीज जाण्याचे कारण म्हणजे पॉवर झोन बदलणे, ज्याला न्यूट्रल सेक्शन म्हणतात. या ठिकाणी काही सेकंदांसाठी वीजपुरवठा आपोआप बंद होतो. तांबरमजवळ ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) मधील एक छोटासा भाग असा आहे, जिथे विद्युत प्रवाह नसतो. हा भाग दोन वेगवेगळ्या पॉवर सब-स्टेशन्सच्या मधला न्यूट्रल सेक्शन असतो.
लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये फरक
एक्सप्रेस ट्रेनमध्ये वीजपुरवठ्याची व्यवस्था वेगळी असल्यामुळे त्यांच्यावर याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, लोकल ट्रेन जेव्हा एका विद्युत झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये प्रवेश करते, तेव्हा सुरक्षा कारणांमुळे काही क्षणांसाठी वीजपुरवठा बंद केला जातो. म्हणजेच, तांबरम स्टेशनवर ट्रेनची वीज जाणे हे कोणतेही गूढ किंवा विचित्र कारण नसून, पूर्णपणे तांत्रिक आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रक्रिया आहे.
कोणतं स्टेशन दोन राज्यात विभागलंय?
देशात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. पण देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे, जे दोन देशात विभागलेलं आहे. म्हणजे ते अर्ध दुसऱ्या राज्यात आणि अर्ध वेगळ्या राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे नवापुर रेल्वे स्टेशन. हेच ते रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभागलं गेलं आहे. या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे, उरलेला अर्धा भाग गुजरातच्या तापीमध्ये आहे.