'पलंगतोड' मिठाई एकदा खा आणि मदमस्त व्हा, पाहा कुठे मिळते 'ही' मिठाई; खाल्ल्यावर नेमकं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:52 IST2026-02-14T13:50:20+5:302026-02-14T13:52:38+5:30

Palangtod Mithai : तुम्हाला माहिती आहे का, भारतातील ते एकमेव शहर कोणते आहे जिथे ही मिठाई खाण्यासाठी लोक रांगा लावतात? चला तर तेच जाणून घेऊया.

Which Indian city famous for Palangtod mithai ingredients you should know | 'पलंगतोड' मिठाई एकदा खा आणि मदमस्त व्हा, पाहा कुठे मिळते 'ही' मिठाई; खाल्ल्यावर नेमकं काय होतं?

'पलंगतोड' मिठाई एकदा खा आणि मदमस्त व्हा, पाहा कुठे मिळते 'ही' मिठाई; खाल्ल्यावर नेमकं काय होतं?

Palangtod Mithai : भारताचा प्रत्येक शहर आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा जपून ठेवतो. या वारशात भारतीय शहरं वेगवेगळ्या अनोख्या वेशभूषा, खाद्यसंस्कृती, नृत्य इत्यादींसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. खाण्यापिण्याची गोष्ट निघालीच तर भारतातील प्रत्येक राज्य, शहर किंवा गाव आपल्या खास आणि चविष्ट पदार्थांसाठी ओळखले जात नाही. तरीही, एक असे शहर आहे जिथे लोकांच्या जिभेवर ‘पलंगतोड मिठाई’ ची गोडी कायमची राहते. तुम्हाला माहिती आहे का, भारतातील ते एकमेव शहर कोणते आहे जिथे ही मिठाई खाण्यासाठी लोक रांगा लावतात? चला तर तेच जाणून घेऊया.

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडिओ

'पलंगतोड मिठाई'बद्दल माहिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ youtubeswadofficial या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सांगितले जाते की, “ही मिठाई खाल्ल्यानंतर इतकी एनर्जी मिळते की खरंच एका फटक्यात पलंग तोडता येईल, म्हणून तिला ‘पलंगतोड’ म्हणतात.” या मिठाईत तब्बल २० थरांची मलाई असते. प्रत्येक थराच्या मध्ये ठेचलेली वेलची, केशर आणि खजूर-गुळाचा रस घातला जातो. अशा पद्धतीने एकावर एक थर रचून ही खास मिठाई तयार केली जाते.

‘पलंगतोड’ नाव कसं पडलं?

या मिठाईला हे नाव कसं पडलं हे कुणालाच सांगता येत नाही. मात्र स्थानिक लोक याबद्दल गंमतीशीर कारणे सांगतात. ही मिठाई अतिशय पौष्टिक, जड आणि ऊर्जा देणारी असल्यामुळे असं नाव पडल्याचं मानलं जातं. ती खाल्ल्यानंतर शरीरात उष्णता वाढते आणि थकवा जाणवतो. दाट मलाई, मेवा, साखर आणि केशरयुक्त ही मिठाई खाल्ल्यानंतर अशी गाढ झोप लागते की जणू पलंगच तुटेल! म्हणूनच हिवाळ्यात शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी ती खास आवडीने खाल्ली जाते.


पलंगतोड मिठाई कुठे मिळते?

ही खास पलंगतोड मिठाई उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे मिळते. ही मिठाई तब्बल १२ तास गोवऱ्यांच्या मंद आचेवर शिजवली जाते. यामध्ये मलाईचे अनेक थर असतात आणि वेलची, केशर तसेच विविध ड्रायफ्रूट्सची टेस्ट असते. काही ठिकाणी तिला ‘बिस्तर बंद’ किंवा ‘बेड रोल’ असंही म्हणतात. बनारसची ही पारंपरिक मिठाई इतकी प्रसिद्ध आहे की दूर-दूरवरून लोक खास ती चाखण्यासाठी येथे येतात, रांगेत उभे राहतात आणि मनसोक्त तिचा आस्वाद घेतात.

Web Title : पलंगतोड़ मिठाई: एक बार खाएं और मदमस्त हो जाएं!

Web Summary : वाराणसी की 'पलंगतोड़ मिठाई', अपनी ऊर्जा बढ़ाने के लिए जानी जाती है, जिसमें क्रीम, इलायची, केसर और खजूर की परतें होती हैं। स्थानीय लोगों का कहना है कि यह इतनी समृद्ध है कि इससे गहरी नींद आती है। यह पारंपरिक मिठाई 12 घंटे तक पकाई जाती है और सर्दियों में बहुत लोकप्रिय है।

Web Title : Palangtod Mithai: Taste this sweet once and get energized!

Web Summary : Varanasi's 'Palangtod Mithai,' known for its energy boost, features layers of cream, cardamom, saffron, and dates. Locals say it's so rich, it induces deep sleep. This traditional sweet is cooked for 12 hours and is very popular in winter.