मनुष्यांनी पहिल्यांदा कशाची शेती केली होती? माहीत नसेल तर जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:08 IST2026-02-14T13:05:44+5:302026-02-14T13:08:14+5:30
Interesting Facts About Crops: साधारण ९ ते १० हजार वर्षांपूर्वी मानवाने नीटपणे शेती करायला शिकले होते. त्या काळातील काही पुरावे दर्शवतात की, शेतीमुळे मानवी जीवनात मोठा बदल झाला.

मनुष्यांनी पहिल्यांदा कशाची शेती केली होती? माहीत नसेल तर जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर...
Interesting Facts About Crops: आज जगात धान्याची वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते, पण नेहमीच असे नव्हते. मानवी विकासाच्या इतिहासात शेतीचा क्रम बराच उशिरा लागतो. असं मानलं जातं की, आधी शिकार करून आणि जंगली फळे-फुले गोळा करून जगणाऱ्या मानवाने साधारण १२,००० वर्षांपूर्वी शेतीसारखं क्रांतिकारी पाऊल उचललं. आजच्या फर्टाइल क्रिसेंट म्हणजेच मध्य पूर्व भागात मानवाने प्रथमच धान्याची लागवड सुरू केली. येथेच एकदाणे असलेला एंकोर्न गहू, एमर गहू आणि जव प्रथम पिकवले गेले. हा प्रदेश आजच्या इस्राईल, जॉर्डन, सीरिया, तुर्की आणि इराकपर्यंत पसरलेला होता.
शेतीने बदलले मानवी जीवन
तज्ज्ञांच्या मते, साधारण ९ ते १० हजार वर्षांपूर्वी मानवाने नीटपणे शेती करायला शिकले होते. त्या काळातील काही पुरावे दर्शवतात की, शेतीमुळे मानवी जीवनात मोठा बदल झाला. शेतीचं ज्ञान मिळाल्यानंतर मानवाने भटकंतीचे जीवन सोडले आणि स्थिर वस्ती करू लागला. हे खरे आहे की शेती सुरू होण्यापूर्वीही मानव धान्य खात होता तो हजारो वर्षांपासून धान्य दळून खात असे पण नियोजित शेती प्रथमच फर्टाइल क्रिसेंटमध्येच सुरू झाली.
चीनमध्ये प्रथम लागवड झालेला तांदूळ
शेतीमुळे उत्पादन झालेलं धान्य साठवण्याची क्षमता वाढली, गावे वसली, लोकसंख्या वाढली आणि सभ्यतांची पायाभरणी झाली. चीनमधील यांग्त्से नदी परिसरात सुमारे ८,००० वर्षांपूर्वी तांदळाची शेती सुरू झाली. त्यानंतर काही शतकं गेल्यावर अमेरिकेत मका पिकवला जाऊ लागला. तरीही या सर्व धान्यांमध्ये एंकोर्न आणि एमर गहू हेच मानवाने पिकवलेले पहिले धान्य मानले जाते. कालांतराने मानवाने शेतीत प्रावीण्य मिळवले आणि हजारो वर्षांच्या सभ्यतेच्या प्रवासात आज विविध प्रकारची धान्ये पिकवू लागला.