विमानाच्या टायरमध्ये कोणती हवा भरली जाते? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:55 IST2025-01-14T12:45:33+5:302025-01-14T12:55:34+5:30
विमानानं प्रवास करणं आणि त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. पण तरीही अशा अनेक गोष्टी असतात. ज्या लोकांना माहीत नसतात.

विमानाच्या टायरमध्ये कोणती हवा भरली जाते? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर!
आजकाल विमानानं प्रवास करणं फारच कॉमन झालं आहे. बरेच लोक विमानानं प्रवास करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. विमानानं प्रवास करणं आणि त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. पण तरीही अशा अनेक गोष्टी असतात. ज्या लोकांना माहीत नसतात.
ढगांना कापत आकाशात उडणाऱ्या विमानातून दिसणारा जमिनीचा नजारा कमाल असतो. विमान इंजीनिअरींचा अद्भूत नमुना मानलं जातं. त्यामुळेच उड्डाण घेताना विमानाची एक एक गोष्ट चेक केली जाते. विमानाचं लॅंडिंग आणि टेकऑफ दोन्हीत टायरची खूप महत्वाची भूमिका असते. हे टायर मजबूत असणं खूप महत्वाचं असतं. कारण एवढ्या मोठ्या विमानाचा भार त्यांच्यावर असतो.
अनेकदा विमान 45 डिग्री ते -5 डिग्री तापमानावरही थांबवलं जातं. अशात जर विमानातील टायरमध्ये ऑक्सीजन किंवा सामान्य गॅस भरला तर त्यावर ओलावा येतो. अशात एखाद्या बर्फाळ ठिकाणावर विमान लॅंड केलं तर यानं टायर ब्लास्ट होऊ शकतात. काही लोकांना वाटतं की, या टायरमध्ये हिलिअम गॅस असतो. पण असं नाहीये.
विमानाचे टायर मजबूत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नायट्रोजन गॅस भरला जातो. नायट्रोजन असा गॅस आहे, ज्यात आग लागत नाही. ज्यामुळे टायरचा आग लागण्यापासून बचाव होतो. कारण नायट्रोजन गॅस खूप मी रिअॅक्टिव गॅस आहे. स्टील आणि अॅल्युमिनिअमला यामुळे गंजही लागत नाही आणि खराबही होत नाही. नायट्रोजन हवेसारखा टायरला घासत नाही.
नायट्रोजन हवाई उड्डाणादरम्यान होणाऱ्या दबावासाठी उपयुक्त आहे. यानं तापमान आणि हवेत अधिक परिवर्तनामुळे होणारा विस्तार आणि संकुचन कमी करतात. विमानात टायर किती असावेत हे विमानाच्या वजनावर ठरतं. कारण विमानाचं वजन समान विभागावं लागतं.