भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश कोणता? 'या' नावाचा आपल्या रोजच्या जगण्याशी आहे संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:36 IST2026-01-20T12:29:40+5:302026-01-20T12:36:27+5:30
Farthest Country From India : जर असं विचारलं की, भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश कोणता? तर हे मात्र सांगायला अनेकांना अवघड जाईल. कारण इतका कुणी विचार करत नाहीत. पण आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश कोणता? 'या' नावाचा आपल्या रोजच्या जगण्याशी आहे संबंध
Farthest Country From India : जगात १९५ देश आहेत असं सांगितलं जातं. प्रत्येक देशाची आपलं एक वेगळेपण असतं, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती असते. वेगवेगळ्या देशांबाबत जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता देखील असते. आता तर भरपूर लोक परदेशात फिरायला जाऊन तेथील जीवन, निसर्ग बघतात. आपणही काही देशांमध्ये फिरून आले असाल.
भारताच्या लगतच्या देशांमध्ये भरपूर लोक सहज फिरून येतात. कारण ते जवळही असतात आणि कमी पैशांमध्ये प्रवासही होते. भारताच्या सगळ्यात जवळचे देश कोणते असं विचारलं तर कुणीही पटकन काही नावं सांगितली. पण जर असं विचारलं की, भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश कोणता? तर हे मात्र सांगायला अनेकांना अवघड जाईल. कारण इतका कुणी विचार करत नाहीत. पण आज आपण हेच जाणून घेणार आहोत.
भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश?
भारताच्या जवळ असलेल्या देशांची नावं तर अनेकांना तोंडपाठ असतात आणि बरेच लोक तर या देशांमध्ये फिरूनही आलेले असतात. पण भारतापासून सगळ्यात दूर देश कोणते हे माहीत नसतं. तर भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश म्हणजे चिली आहे. चिली दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. हा देश भारतापासून साधारण १७ हजार ते १९ हजार इतक्या अंतरावर आहे. हे अंतर नकाशावर अवलंबून आहे. तेच चिलीनंतर नंबर लागतो तो पेरू, इक्वाडोर, कोस्टा रिका आणि पनामा या देशांचा. हे देशही भारतापासून सगळ्यात दूर आहेत.
भारताच्या सगळ्यात जवळचे देश?
भारताच्या सर्वात जवळचा देश बांग्लादेश आहे, कारण त्याची सीमारेषा सर्वाधिक लांबीची सुमारे ४०९६.७ किमी असून ती भारताला लागून आहे. त्यानंतर चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान हे देश आहेत, तर श्रीलंका आणि मालदीव हे सागरी सीमा असलेले शेजारी आहेत, ज्यांची सुरुवात भारताच्या अगदी जवळून होते.
भारताचे शेजारी देश सीमेच्या लांबीनुसार
बांग्लादेश: ४०९६.7 किमी
चीन: ३४८८ किमी
पाकिस्तान: ३३२३ किमी
नेपाळ: १७५२ किमी
म्यानमार: १६४३ किमी
भूतान: ५७८ किमी
अफगाणिस्तान: १०६ किमी
श्रीलंका: २८८ किमी (समुद्री सीमा)
मालदीव: १०१० किमी (समुद्री सीमा)
अमेरिका आणि रशिया किती दूर?
भारतापासून सगळ्यात दूर असलेल्या देशाबाबत तर आपण माहिती पाहिली. आता नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भारतासोबत चांगले संबंध असलेल्या अमेरिकेचं आणि रशियाचं भारतातून किती अंतर आहे हेही जाणून घेऊ. भारतापासून अमेरिकेचं अंतर हे थेट १२, ०५३ किलोमीटर आहे. तेच विमानाने हे अंतर १३, ५६८ किलोमीटर इतकं होतं. तर रशिया भारतापासून ४ हजार किलोमीटर ते ४ हजार ३०० किलोमीटर अंतरावर आहे.