कोणत्या देशांमध्ये आहे जगातील सगळ्यात स्वच्छ गुणवत्तेचं पाणी, याबाबत भारताचा नंबर कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:15 IST2026-04-06T12:14:22+5:302026-04-06T12:15:26+5:30

World Cleanest Water : एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्समध्ये कोणत्या देशातील पाणी सगळ्यात जास्त स्वच्छ असतं, हे सांगण्यात आलं आहे. पाण्याच्या स्वच्छतेची टक्केवारी ठरवण्यात आलीये.

Which countries have the world's cleanest water, where India stand in List | कोणत्या देशांमध्ये आहे जगातील सगळ्यात स्वच्छ गुणवत्तेचं पाणी, याबाबत भारताचा नंबर कोणता?

कोणत्या देशांमध्ये आहे जगातील सगळ्यात स्वच्छ गुणवत्तेचं पाणी, याबाबत भारताचा नंबर कोणता?

World Cleanest Water : पाणी हे जीवन आहे. सगळ्यांनाच रोज प्यायला स्वच्छ पाणी लागतं. बरेच असे देश आहेत जिथे पिण्याचं १०० टक्के स्वच्छ पाणी मिळतं. बऱ्याच देशात पाणी स्वच्छ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि पर्यावरणासंबंधी कठोर नियम पाळले जातात. तर बरेच देश असे आहेत जिथे प्रदूषण खूप आहे आणि पाण्याची गुणवत्ताही खूप बेकार आहे. एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्समध्ये कोणत्या देशातील पाणी सगळ्यात जास्त स्वच्छ असतं, हे सांगण्यात आलं आहे. या यादीत भारत कोणत्या नंबरवर आहे हेही सांगण्यात आलंय. चला तर पाहुयात कुठलं पाणी सगळ्यात स्वच्छ आहे. 

सगळ्यात स्वच्छ पाणी कुठलं?

एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्सनुसार, फिनलँड आणि आइसलँड या दोन देशांना सुरक्षित आणि स्वच्छ पाण्यासाठी १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. हे दोन्ही देश स्वच्छ पाण्यासाठी जागतिक स्तरावर सगळ्यात वरच्या नंबरवर येतात. या देशांनी पाणी स्वच्छ करण्यासाठी खूप आधुनिक अशी सिस्टीम तयार केली आणि पर्यावरणासंबंधी नियमांचं काटेकोर पालनही केलं जातं. त्यानंतर नंबर लागतो तो ब्रिटनचा आणि मग स्वित्झर्लॅंड या देशांचा. येथील पाणीही खूप स्वच्छ आहे.

सिंगापूर आणि कॅनडात काय?

आशियाई देशांमध्ये सिंगापूर पाण्याच्या नियोजनात खूप पुढे आहे. कमी नैसर्गिक संपत्ती असूनही या देशाने नेहमीच स्वच्छ पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी अॅडव्हान्स रीसायकलिंग सिस्टीम इथे उभारली आहे. कॅनडा  सुद्धा टॉप देशांमध्ये सहभागी आहे. याचं श्रेय त्यांच्या विशाल ताज्या पाण्याच्या भांडाराला आणि पर्यावरणाच्या मजबूत सुरक्षेला जातं. जगातील ताज्या पाण्याचा स्त्रोतांचा पाचवा भाग इथेच आढळतो.

भारताची स्थिती काय?

वैश्विक पाण्याच्या गुणवत्तेच्या रँकिंगमध्ये भारताची स्थिती चिंताजनक आहे. २०२४ च्या एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्समध्ये भारतात १८० देशांमध्ये १७६ व्या स्थानावर आहे. यामुळे भारत पर्यावरण आरोग्याबाबत सगळ्यात बेकार प्रदर्शन करणारा देश ठरतो. 

स्वच्छ पाण्यासाठी भारताचं रँकिंग खूप कमी असण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. नद्यांमध्ये प्रदूषण, घाण पाणी रीसायकल करण्यासाठी कमी सुविधा अशा कारणांचा यात समावेश होतो. लाखो लोकांना अजूनही त्यांच्या घरांपर्यंत सुरक्षित पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना दूषित किंवा दूरच्या स्त्रोतांवर अवलंबून रहावं लागतं. इतकी आव्हानं असूनही भारतात जगातील सगळ्यात स्वच्छ उमनगोट नदी आहे. मेघालयाच्या डाउकीमधील ही नदी इतकी स्वच्छ आहे की, त्यावर होडी तरंगताना दिसते.

Web Title : दुनिया का सबसे स्वच्छ पानी: कौन से देश शीर्ष पर? भारत कहाँ है?

Web Summary : फ़िनलैंड और आइसलैंड में सबसे स्वच्छ पानी है। प्रदूषण और खराब रीसाइक्लिंग के कारण भारत का स्थान नीचे है, हालाँकि यहाँ उमंगोट नदी है।

Web Title : World's Cleanest Water: Which countries rank highest? Where does India stand?

Web Summary : Finland and Iceland top the list for cleanest water. India ranks low due to pollution and poor recycling, despite having the pristine Umngot River.