भारतात तेलाचा शोध कधी लागला, पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? भारताचा तेलाचा इंटरेस्टिंग इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:06 IST2026-04-01T12:06:13+5:302026-04-01T12:06:39+5:30

Petrol History : अनेकांना काही प्रश्न पडताहेत की, भारतात पेट्रोल कधी आलं होतं? पहिल्यांदा कोणत्या देशातून पेट्रोल इंपोर्ट करण्यात आलं आणि देशातील पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं?

When did petrol arrive in India, know the Indian petrol history | भारतात तेलाचा शोध कधी लागला, पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? भारताचा तेलाचा इंटरेस्टिंग इतिहास

भारतात तेलाचा शोध कधी लागला, पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? भारताचा तेलाचा इंटरेस्टिंग इतिहास

Petrol History : इराण, अमेरिका - इस्त्राइल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा प्रभाव तेलाच्या किंमतीवर बघायला मिळतोय. अनेक देशांमध्ये तर तेलाचा पुरवठा बंद झालाय. सगळीकडे सध्या पेट्रोल आणि गॅसची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर तर पेट्रोलबाबत वेगवेगळ्या चर्चा बघायला मिळत आहेत. अशात अनेकांना काही प्रश्न पडताहेत की, भारतात पेट्रोल कधी आलं होतं? पहिल्यांदा कोणत्या देशातून पेट्रोल इंपोर्ट करण्यात आलं आणि देशातील पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत.

भारतात तेलाचा शोध कधी लागला?

भारताचा पेट्रोलियमशी संबंध हा १८८९ सालापासून आला. आसामच्या डिगबोईमध्ये पहिल्यांदा तेल शोधण्यात आलं होतं. महत्वाची बाब म्हणजे तेलाचे संकेत अनेक वर्षांआधी म्हणजे १८६६ मध्येच मिळाले होते. पण तेलाचा शोध लागूनही व्यावसायिक रूपाने तेल काढणं शक्य झालं नव्हतं. असं सांगितलं जातं की, रेल्वे बनवण्यादरम्यान ब्रिटिश इंजिनिअर्सना हत्यारांवर तेलाचे डाग दिसले होते. त्यांनी मजुरांना इंग्रजीत डिग, बॉय, डिग असं म्हटलं. म्हणजे खोद बेटा खोद. याच कारणाने या ठिकाणाचा नाव डिगबोई पडलं.

आशियातील पहिली तेल रिफायनरी 

तेलाचा शोध लागल्यानंतर १९०१ मध्ये आसाम ऑइल कंपनीने डिगबोईमध्ये एक रिफायनरी सुरू केली. इथे भारतात पहिल्यांदा पेट्रोल बनण्यात आलं. ही रिफायनरी केवळ भारतातीलच नाही तर पूर्ण आशियातील पहिली रिफायनरी होती. त्यामुळे या रिफायनरीला भारताच्या हायड्रोकार्बन क्षेत्राची गंगोत्री म्हटलं जातं.

पेट्रोलची आयात आणि पहिलं पेट्रोल पंप

जेव्हा आसाममध्ये तेल रिफाइन केलं जात होतं, तेव्हा २०व्या शतकाच्या सुरूवातीला पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात पेट्रोलची उपलब्धता होईल हे ठरलं. सगळ्यात महत्वाचं पाउल १९२८ सालात उचलण्यात आलं. एशियाटीक पेट्रोलियम कंपनीने मुंबईच्या लॅमिंगटन रोडवर देशातील पहिलं पेट्रोल पंप सुरू केलं.

पेट्रोल कुठून इंपोर्ट केलं जात होतं?

आपल्याकडे स्वत:चा तेल भांडार असूनही भारताकडे सुरूवातीला रिफाइन करण्याची पुरेशी क्षमता नव्हती. त्यामुळे तेल इंपोर्ट करावं करावं लागत होतं. ब्रिटिश शासनादरम्यान बर्मा ऑइल कंपनी आणि एशियाटिक पेट्रोलियमसारख्या कंपनी आयात आणि वितरणाचं काम सांभाळत होत्या. पेट्रोल इराक, इराण, सौदी अरेबिया आणि म्यांमारहून मागवलं जात होतं. तेलाचा मोठा भांडार असलेले हे देश स्वातंत्र्याआधी आणि नंतरही भारतासाठी मोठे तेल पुरवठादार बनले. 

Web Title : भारत का तेल इतिहास: खोज, पहला पेट्रोल पंप और आयात

Web Summary : भारत में तेल की पहली खोज 1889 में असम के डिगबोई में हुई थी। एशिया की पहली तेल रिफाइनरी 1901 में वहीं स्थापित की गई थी। 1928 में, भारत का पहला पेट्रोल पंप मुंबई में खुला। शुरुआत में, भारत ने सीमित शोधन क्षमता के कारण इराक, ईरान, सऊदी अरब और म्यांमार से तेल का आयात किया।

Web Title : India's Oil History: Discovery, First Petrol Pump, and Imports

Web Summary : Oil was first discovered in Assam's Digboi in 1889. Asia's first oil refinery was established there in 1901. In 1928, India's first petrol pump opened in Mumbai. Initially, India imported oil from Iraq, Iran, Saudi Arabia, and Myanmar due to limited refining capacity.