When BF stops girlfriend from snoring by licking her face | बोंबला! गर्लफ्रेन्डच्या घोरण्याने तो झाला होता हैराण, 'ही' विचित्र ट्रिक वापरून केला तिचा आवाज बंद!

बोंबला! गर्लफ्रेन्डच्या घोरण्याने तो झाला होता हैराण, 'ही' विचित्र ट्रिक वापरून केला तिचा आवाज बंद!

(Image Credit : boston25news.com)(Representative Image)

आपल्या आजूबाजूला जर कुणी घोरणारा व्यक्ती झोपला तर रात्रभर झोपेचं खोबरं कसं होतं हे अनेकांनी अनुभवलं असेल. वेगवेगळ्या आयडिया करूनही त्या व्यक्तीचं घोरणं काही बंद होत नाही. पण एका पठ्ठ्याने त्याच्या घोरणाऱ्या गर्लफ्रेन्डवर एक विचित्र ट्रिक वापरली आणि तिचं घोरणं बंद झाल्याचा दावा त्याने केलाय. जेसन ग्राहम आणि शार्नी ब्राइट असं या कपलचं नाव असून गेल्या सात महिन्यांपासून ते सोबत आहे. पण या सात महिन्यात जेसन ब्राइटच्या घोरण्याने हैराण झालाय.

टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, जेसनने सांगितले की, ब्राइटचं घोरणं इतकं जोरात असतं की, झोपच येत नाही. त्याने असा निश्चय केला होता की, तो तिचं घोरणं बंद करणार. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या. इतकेच तर तो तिचं घोरणं बंद व्हावं म्हणून तिला जवळ घेऊन झोपत होता. पण काही दिवसांनी तिचं घोरणं पुन्हा सुरू व्हायचं.

(Image  Credit : womensalphabet.com)

जेसनने सांगितले की, एक दिवस त्याने गर्लफ्रेन्ड ब्राइटचा चेहरा जिभेने चाटला आणि तिचं घोरणं बंद झालं. तो म्हणाला की, हे एखाद्या जादूसारखं होतं. मजेदार बाब म्हणजे ब्राइटला याची जराही कल्पना नव्हती की तिचा पार्टनर झोपेत तिचा चेहरा चाटतो. सध्या जेव्हाही ब्राइट घोरायला लागते जेसन तिचा चेहरा चाटतो.

यावर ब्राइट म्हणाली की, जेव्हा सकाळी ती झोपेतून उठत होती तेव्हा तिला तिचा चेहरा थोडा भिजलेला वाटत होतं. आधी तिने विचार केला की, तिच्याकडूनच काही चुकीचं झालं असेल. पण तिने जेव्हा जेसनला याबाबत विचारले तर जेसनने काहीही उत्तर दिले नाही. आता ब्राइटला जेसनवर संशय आहे.

हे पण वाचा :

बाबो! नागिणीसाठी आपसात भिडले दोन नाग, पण दोघांच्या भांडणात नागीण पसार...

बाबो! डाग लागलेल्या या जीन्सची किंमत वाचून व्हाल हैराण, व्हायरल झाले फोटो...

बोंबला! चोरी करायला गेलेला चोर एसीमुळे त्याच घरात झोपला अन्.....

Web Title: When BF stops girlfriend from snoring by licking her face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.