Whatsapp च्या निर्मात्यावर आली त्याच्या आलिशान कार्स विकण्याची वेळ, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 12:41 IST2019-01-15T12:39:50+5:302019-01-15T12:41:46+5:30

Jan Koum हा व्यक्ती व्हॉट्सअॅप मेसेंजरचा को-फाऊंडर आहे. गेल्यावर्षीच त्याने राजीनामा दिला होता.

Whatsapp co-founder Jan Koum is selling 10 of his porsches news goes viral | Whatsapp च्या निर्मात्यावर आली त्याच्या आलिशान कार्स विकण्याची वेळ, जाणून घ्या कारण!

Whatsapp च्या निर्मात्यावर आली त्याच्या आलिशान कार्स विकण्याची वेळ, जाणून घ्या कारण!

Jan Koum हा व्यक्ती व्हॉट्सअॅप मेसेंजरचा को-फाऊंडर आहे. गेल्यावर्षीच त्याने राजीनामा दिला. त्यावेळी त्याने सांगितले होते की, तो आता काही वेळ त्याच्या एकापेक्षा एक लक्झरी पोर्शे कार्ससोबत घालवणार आहे. पण आता अशी बातमी आहे की, तो त्याच्या दहा पोर्शे कार्सचा लिलाव करणार आहे. 

Jan याला पोर्शे कारची फार आवड आहे. पण आता तो त्याच्या कारचा लिलाव करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, फ्लोरिडाच्या एमिलिया आयलॅंडवर या कार्सचा लिलाव होणार आहे. ८ मार्च २०१९ रोजी या कार्सचा लिलाव होईल. 

अर्थातच अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की, तो त्याच्या या आलिशान कार्स का विकतो आहे? त्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्याकडे त्याच्या या कार्स चालवण्यासाठी वेळच नाहीये. त्यामुळेच त्याने या कार्सचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय.
Jan या कार्सना त्याच्या मुलांसारखं मानतो. त्याने पहिली पोर्श कार १६ वर्षांचा असताना विकत घेतली होती. त्याच्या या १० कार्सपैकी अनेक कार्स या मॉडिफाइडही करण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: Whatsapp co-founder Jan Koum is selling 10 of his porsches news goes viral