Bathroom Sink Small Hole : हल्ली घराघरांमध्ये वॉश बेसिन बघायला मिळात. सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करण्यापासून ते रात्री जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी अशा अनेक कामांसाठी वॉश बेसिनचा वापर केला जातो. वॉश बेसिनमध्ये हात किंवा तोंड धुताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, पाण्याच्या निचऱ्यासाठी असलेल्या मोठ्या छिद्रासोबतच यात एक छोटं छिद्र असतं. नळाच्या खाली एक छोटं छिद्र असतं.
अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांचा आपण रोज वापर करतो, या गोष्टी आपण रोज बघतही असतो. असंच काहीसं वॉश बेसिनबाबतही आहे. बेसिनचा वापर आपण रोज करतो, पण त्यातील नळाखाली असलेल्या छोट्या छिद्राचं नेमकं काम काय असतं हे आपल्याला माहीत नसतं. जास्तीत जास्त लोकांना याचा उद्देश माहीत नसेल. तोच आज जाणून घेणार आहोत.
बेसिनमधील छोट्या छिद्राचं काम काय?
वॉश बेसिनमध्ये असलेल्या छोट्या छिद्राचं मु्ख्य काम हे ओव्हरफ्लो रोखण्यासाठी असतं. काही वेळा असं होतं की, पाणी जाण्याच्या मोठ्या छिद्रात काहीतरी अडकतं. ज्यामुळे सिंकमधून पाणी जात नाही किंवा ते हळूहळू बाहेर जातं. तेव्हा हे छोटं छिद्र आपलं काम करतं. सिंकमध्ये भरलेलं पाणी या छिद्रापर्यंत आलं की, यातून पाणी बाहेर जाऊ लागतं. यामुळे सिंकच्या वरून पाणी बाहेर येत नाही.
वॉश बेसिनमधील या छोट्या छिद्राचं दुसरं काम म्हणजे हवा बाहेर काढणं. जेव्हा ड्रेनच्या छिद्रातून हवा निघत नाही तेव्हा पाणी हळूहळू सिंकमधून बाहेर जातं. अशात या छिद्राच्या माध्यमातून हवा पास होते. हवे व्यवस्थित निघाल्यावर सिंक व्यवस्थित काम करतं. इतकंच नाही तर बाथटबमध्ये देखील असं एक छोटं छिद्र असतं. त्याला ओव्हरफ्लो होल असं म्हणतात.
अनेकदा लोक बाथटबमधील नळ सुरू करून दुसरं काम हाती घेतात. कामात बिझी झाल्यावर बाथटब कधी भरतो कळतंच नाही. हेच पाणी बाथरूमच्या बाहेरही येण्याचा धोका असतो. अशात टब भरला की, ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून छोटं छिद्र असतं. ज्यातून एक्स्ट्रा पाणी बाहेर काढलं जातं.
Web Summary : That small hole in sinks prevents overflow by draining excess water when the main drain is blocked, and it also allows air to escape, ensuring proper drainage. This feature is also present in bathtubs.
Web Summary : सिंक में छोटा छेद ओवरफ्लो को रोकता है, अतिरिक्त पानी निकालकर, और हवा को निकलने देता है, जिससे जल निकासी ठीक से होती है। यह सुविधा बाथटब में भी होती है।