दिल्ली की काही वेगळंच? भारताच्या राजधानीबाबतचा मोठा गैरसमज; ९९ टक्के लोकांना 'हे' माहितच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 15:17 IST2026-01-26T15:16:29+5:302026-01-26T15:17:40+5:30

Interesting Facts : सामान्यपणे सगळे लोक दिल्ली हीच भारताची राजधानी मानतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, हे चुकीचं उत्तर आहे. भारताची राजधानी दिल्ली नाही.

What is the real capital of India? 99 percent Indians give wrong answer | दिल्ली की काही वेगळंच? भारताच्या राजधानीबाबतचा मोठा गैरसमज; ९९ टक्के लोकांना 'हे' माहितच नाही

दिल्ली की काही वेगळंच? भारताच्या राजधानीबाबतचा मोठा गैरसमज; ९९ टक्के लोकांना 'हे' माहितच नाही

Interesting Facts :  प्रत्येक देशाची आपली एक राजधानी असते. असं एक शहर जे देशाचं प्रतिनिधीत्व करतं. शाळेतील प्रत्येक देशाची किंवा राज्याची राजधानी याबाबत शिकवलं जातं. भारताची राजधानी कोणती हेही सांगितलं जातं. देशाची राजधानी असलेल्या ठिकाणाला फार महत्व असतं. जवळपास सगळ्यांनाच आपापल्या देशाच्या राजधानीचं नाव माहीत असतं.

भारतातील जास्तीत जास्त लोकांना जर विचारलं की, भारताची राजधानी कोणती आहे तर सगळ्यांचं उत्तर दिल्ली असं असेल. सामान्यपणे सगळे लोक दिल्ली हीच भारताची राजधानी मानतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, हे चुकीचं उत्तर आहे. भारताची राजधानी दिल्ली नाही.

अनेकांना हे माहीत नाही की, भारताची राजधानी दिल्ली नाही. भारताची राजधानी वेगळी आहे. भारताची राजधानी दिल्ली नाही तर नवी दिल्ली आहे. यामागचं कारणही जाणून घेऊ. विषय असा आहे की, दिल्लीमध्ये एकूण ११ जिल्हे आहेत. यात नॉर्थ दिल्ली, नॉर्थ ईस्ट दिल्ली, नॉर्थ वेस्ट दिल्ली, वेस्ट दिल्ली, साऊथ दिल्ली, साऊथ वेस्ट दिल्ली, साऊथ ईस्ट दिल्ली, नई दिल्ली, सेंट्रल दिल्ली, शाहदरा आणि ईस्ट दिल्ली यांचा समावेश आहे. या अकरा जिल्ह्यांना मिळून दिल्ली बनली आहे आणि यातील एक जिल्हा नवी दिल्ली भारताची राजधानी आहे.


जर तुम्हाला दिल्ली एनसीआरबाबत सांगायचं तर यात 35 जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान यांच्यात वाटले आहेत. म्हणजे दिल्ली, नवी दिल्ली आणि दिल्ली एनसीआर हे तिन्ही भाग वेगवेगळे आहेत. पण लोक माहिती नसल्याने या सगळ्या भागांना एकच मानतात. जेव्हा लोकांना यांबाबत काही विचारलं जातं तेव्हा चुकीचे उत्तर देतात. अशात आता जर तुम्हाला देशाची राजधानी कोणती? तेव्हा बरोबर उत्तर द्याल.

Web Title : दिल्ली या नई दिल्ली? भारत की राजधानी के बारे में एक आम गलत धारणा।

Web Summary : कई लोग गलत तरीके से मानते हैं कि दिल्ली भारत की राजधानी है। वास्तव में, नई दिल्ली आधिकारिक राजधानी है। दिल्ली में नई दिल्ली सहित ग्यारह जिले शामिल हैं, जिनके पास राजधानी का दर्जा है। दिल्ली एनसीआर में कई राज्यों में फैले 35 जिले शामिल हैं।

Web Title : Delhi or New Delhi? A common misconception about India's capital.

Web Summary : Many incorrectly believe Delhi is India's capital. Actually, New Delhi is the official capital. Delhi comprises eleven districts, including New Delhi, which holds the capital status. The Delhi NCR includes 35 districts spread across multiple states.