अमेरिकेत शेतीतून कोणत्या पिकाचं सगळ्यात जास्त उत्पादन घेतलं जातं? दुसरं नाव ऐकून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:44 IST2026-04-04T13:30:22+5:302026-04-04T13:44:09+5:30
Knowledge Fact : अमेरिकेत सगळ्यात जास्त शेती कशाची केली जाते? काही लोकांना याबाबत माहिती असेल. पण जास्त लोकांना याची माहिती नसेल. तिच आज आपण जाणून घेणार आहोत.

अमेरिकेत शेतीतून कोणत्या पिकाचं सगळ्यात जास्त उत्पादन घेतलं जातं? दुसरं नाव ऐकून व्हाल अवाक्
Knowledge Fact : सध्या सगळ्या जगाचं लक्ष हे इराण, अमेरिका आणि इस्त्राइल यु्द्धाकडे लागलं आहे. बऱ्याच दिवसांपासून अमेरिकला आणि इस्त्राइलने इराणवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्याचा प्रभाव जगभरातील अनेक गोष्टींवर पडला आहे. युद्ध सुरू झालं आणि तिन्ही देशांच्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू झाली. त्यांचा इतिहास, संस्कृती, राजकारण सगळेच चर्चेचे विषय आहेत. अशात अमेरिकेतील शेतीबाबतही काही लोकांना प्रश्न पडले. म्हणजे अमेरिकेत सगळ्यात जास्त शेती कशाची केली जाते? काही लोकांना याबाबत माहिती असेल. पण जास्त लोकांना याची माहिती नसेल. तिच आज आपण जाणून घेणार आहोत.
अमेरिकेत कशाची शेती जास्त केली जाते?
हे तर आपणा सर्वांना माहीत आहे की, जगातील प्रत्येक देशात कशाची ना कशाची शेती नक्कीच केली जाते. देशाचं वातावरण आणि जलवायुनुसार तिथे शेती केली जाते. अशात देशातील सगळ्यात शक्तीशाली देश म्हटला जाणारा अमेरिका कशाची शेती करतो? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. इथे गहू पिकवतात की आणखी काही हे अनेकांना माहीत नसतं. तर काही रिपोर्टनुसार, अमेरिकेत साधारण ९० मिलियन एकरापेक्षा जास्त जमिनीवर मक्याची शेती केली जाते. हे इथे घेतलं जाणारं सगळ्यात मोठं पिक आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण इथे दुसरं सगळ्यात जास्त पिक सोयाबीनचं घेतलं जातं. तर तिसऱ्या क्रमांकावर गहूचा नंबर लागतो. अमेरिकेत मक्याची शेती वेश्विक उत्पादनाच्या साधारण ३५ टक्के आहे.
तेच जर मक्याच्या उत्पादनाबाबत भारताबाबत सांगायचं तर भारताचा यात चौथा नंबर लागतो. भारताचं जगभरात मक्याच्या शेतीत एकूण २ टक्के योगदान आहे. त्याशिवाय संयुक्त राज्य अमेरिकेत ८२ मिलिअन एकरापेक्षा अधिक शेतांमध्ये सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं. जे जागतिक स्तरावर ५० टक्के इतकं आहे. तर प्राण्यांच्या खाण्यासाठी साधारण ५३ मिलिअन एकरापेक्षा जास्त जमिनीवर गवत उगवलं जातं. तर गव्हाची शेती इथे साधारण ३७ मिलिअन एकरापेक्षा जास्त जमिनीवर घेतलं जातं.