रेल्वेच्या डब्यावर लिहिलेल्या 'या' 5 आकडी कोडचा नेमका अर्थ, यात लपलेली असतात अनेक गुपितं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:41 IST2025-12-26T15:39:46+5:302025-12-26T15:41:15+5:30

Railway Unique Code : तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल की, रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 अंकी नंबर लिहिलेला असतो. हा नंबर पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, या नंबरचा अर्थ काय आहे?

What is the meaning of 5 digit number written on the train coach | रेल्वेच्या डब्यावर लिहिलेल्या 'या' 5 आकडी कोडचा नेमका अर्थ, यात लपलेली असतात अनेक गुपितं

रेल्वेच्या डब्यावर लिहिलेल्या 'या' 5 आकडी कोडचा नेमका अर्थ, यात लपलेली असतात अनेक गुपितं

Railway Unique Code Meaning : लाखो लोक रोज रेल्वेने एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त, आरामदायक आणि भरपूर वेगळे अनुभव देणारा असतो. असं असलं तरी अनेक प्रवाशांना रेल्वेच्या अनेक गोष्टी माहीत नसतात. असे अनेक कोड्स असतात ज्यांमध्ये भरपूर माहिती किंवा काही गुपित लपलेलं असतं. जी आपल्याला माहीत असणं महत्वाचं असतं. रेल्वेचा रंग असेल, पीएनआर कोड असेल याबाबत आपल्या माहिती असणं गरजेचं असतं. आज रेल्वेच्या अशाच एका कोडबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. जी कदाचित आपल्याला माहीत नसेल. तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल की, रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 अंकी नंबर लिहिलेला असतो. हा नंबर पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, या नंबरचा अर्थ काय आहे? किंवा हा कशासाठी लिहिलेला असेल? मोजक्याच लोकांना या नंबरचा अर्थ माहीत असेल. अशात आज आपण या नंबरचा अर्थ जाणून घेणार आहोत.

5 अंकी कोडचा अर्थ काय?

रेल्वेच्या डब्यावर हा 5 अंकी नंबर ठळकपणे लिहिलेला असतो. यातील सुरूवातीच्या 2 आकड्यांवरून या रेल्वेच्या निर्माणाचं वर्ष म्हणजे ही रेल्वे कधी तयार करण्यात आली हे कळून येतं. उदाहरणार्थ 03230 चा अर्थ होतो रेल्वेचा हा कोच 2003 मध्ये निर्मित कोच आहे, 07052 चा अर्थ होतो 2007 मध्ये निर्मित कोच किंवा 97132 चा अर्थ 1997 मध्ये निर्मित कोच होतो. तर पुढील 3 आकड्यांचा अर्थ हा खालीलप्रमाणे सांगता येईल.

001 - 025 : AC प्रथम श्रेणीवर, वर्ष 2000/2001 मधील काही डबे किंवा कोच

026 - 050 : 1 AC + एसी - 2 टी

051 - 100 : AC - 2T म्हणजे एसी 2 टीअर

101 - 150 : AC - 3T म्हणजे एसी 3 टीअर

151 - 200 : CC म्हणजे एसी चेअर कार

201 - 400 : SL म्हणजे द्वितीय श्रेणी स्लीपर

401 - 600 : GS म्हणजे सामान्य द्वितीय श्रेणी

601 - 700 : 2S म्हणजे द्वितीय श्रेणी सिटींग/जनशताब्दी चेअर कार

701 - 800 : SLR सिटींग कम लगेच रॅक

801+ : पॅंटी कार, व्हिपीयू, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार इत्यादी....

ज्या रेल्वेचा पहिला नंबर 0 ने सुरू होतो, ती रेल्वे स्पेशल रेल्वे असते. या सामान्यपणे होळीच्या वेळी किंवा उत्सवात चालतात. तेच एसी रेल्वेबाबत सांगायचं तर त्यांची सुरूवात 1 नंबरने होते. या रेल्वे कमी अंतरावर चालणाऱ्या असतात. त्याऐवजी नंबर 2 असलेल्या रेल्वे जास्त लांब पल्ल्याच्या असतात.

पीएनआरचा अर्थ काय होतो?

पीएनआरचा फुल फॉर्म पॅसेंजर नेम रेकॉर्ड (Passenger Name Record) असा आहे. जेव्हा आपण बुकिंग करतो तेव्हा एक डिजिटल रेकॉर्ड तयार होतो, जो या १० अंकी कोडमध्ये असतो. प्रत्येक आरक्षित तिकिटासाठी हा कोड रिलीज केला जातो.

कसा तयार होतो पीएनआर नंबर?

पीएनआर नंबर कसा तयार होतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हा यूनिक नंबर कसा तयार होतो, हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. हा नंबर प्रवाशासाठी एकप्रकारे ओळखपत्रच असतो. तिकिटावर हा नंबर असतो, त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना डिजिटल किंवा फिजिकल तिकीट दाखवायचं असतं.

Web Title : रेलवे कोच नंबरों का रहस्य: एक संपूर्ण गाइड

Web Summary : क्या आपने कभी ट्रेन कोचों पर 5 अंकों के कोड के बारे में सोचा है? पहले दो अंक निर्माण वर्ष बताते हैं, जबकि शेष कोच का प्रकार बताते हैं, जैसे एसी या स्लीपर। साथ ही, पीएनआर पैसेंजर नेम रिकॉर्ड है, जो आपके टिकट पर एक डिजिटल आईडी है।

Web Title : Decoding the Secret of Railway Coach Numbers: A Complete Guide

Web Summary : Ever wondered about the 5-digit code on train coaches? The first two digits reveal the manufacturing year, while the rest indicate the coach type, like AC or Sleeper. Also, PNR is Passenger Name Record, a digital ID on your ticket.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.