बाथरूम आणि वॉशरूममध्ये असतो फरक, पण बऱ्याच लोकांना नसतो माहीत...आता जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:41 IST2026-03-28T13:35:41+5:302026-03-28T13:41:10+5:30

Amazing Facts : बरेच लोक बाथरूम आणि वॉशरूमधील फरक समजू शकत नाही. आपल्याला माहीत आहे का बाथरूम आणि वॉशरूममध्ये काय फरक असतो? नसेल माहीत तर आता जाणून घ्या..

What is the difference between bathroom and washroom | बाथरूम आणि वॉशरूममध्ये असतो फरक, पण बऱ्याच लोकांना नसतो माहीत...आता जाणून घ्या....

बाथरूम आणि वॉशरूममध्ये असतो फरक, पण बऱ्याच लोकांना नसतो माहीत...आता जाणून घ्या....

Amazing Facts : बाथरूम आणि वॉशरूम या दोन्ही शब्दांचा आणि रूमचा वापर आपण रोज करतो. वेगवेगळ्या मॉल्समध्ये, हॉटेल्समध्ये किंवा ऑफिसेसमध्ये या जागांचा आपण वापर करतो. सामान्यपणे टॉयलेट्सच्या बाहेर तीन प्रकारचे बोर्ड लावलेले असतात. त्यात काही ठिकाणी WC लिहिलेलं असतं, कुठे बाथरूम किंवा मग वॉशरूम लिहिलेलं असतं. यातील WC म्हणजे वॉटर क्लोसेट हे तर लोकांना सहजपणे कळतं. बरेच लोक बाथरूम आणि वॉशरूमधील फरक समजू शकत नाही. आपल्याला माहीत आहे का बाथरूम आणि वॉशरूममध्ये काय फरक असतो? नसेल माहीत तर आता जाणून घ्या..

बाथरूम म्हणजे काय?

'बाथ' या शब्दावरूनच स्पष्ट होतं की, ही जागा मुख्यपणे आंघोळीसाठी आहे. साधारणपणे शॉवर, बाथटब, वॉश बेसिन आणि अनेकदा टॉयलेटही लावलेले असतात. हे मुख्यपणे घरांमध्ये वापरले जातात. यात लोक आंघोळ करतात, केस धुतात, कपडे धुतात आणि स्वच्छतेसाठी जातात. भारतात आता जास्तीत जास्त घरांमध्ये अटॅच्ड बाथरूम असतात, ज्यात टॉयसेट + शॉवर + सिंक सगळंच एकत्र दिलं जातं. त्यामुळे लोक बाथरूम सांगत टॉयलेटला जातात. हे जरा विचित्र वाटतं. 

वॉशरूम काय असतं?

वॉश शब्दाचा अर्थ होतो धुणे...म्हणजे ही जागा धुण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी आहे. यात मु्ख्यपणे टॉयलेट(शौचालय), वॉश बेसिन आणि कधीकधी यूरिनल असतं, पण आंघोळीची सुविधा नसते. वॉशरूम जास्तकरून पब्लिक प्लेस जसे की, ऑफिस, शाळा, मॉल, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि हॉटेल इत्यादी ठिकाणी असतात. 

दोन्हीत फरक काय?

जसे की आम्ही सांगितले बाथरूम आणि वॉशरूम दोन्ही शब्दांमध्ये तेवढाच फरक आहे, जेवढा दोन्ही जागांमध्ये आहे. पण असं अनेकदा होतं की, लोक दोन्ही नावं ऐकून फार कन्फ्यूज होतात आणि दोन्ही शब्दांपैकी योग्य शब्दाची निवड करू शकत नाही. बरेच लोक सगळ्याच गोष्टींसाठी सेम शब्द वापरतात. जसे की, वॉशरूम किंवा बाथरूम...आता आपल्या लक्षात आला असेल दोन्हीतील फरक.

Web Title : बाथरूम और वॉशरूम: अब जानिए मुख्य अंतर!

Web Summary : बाथरूम नहाने के लिए होते हैं, जिनमें अक्सर शॉवर और शौचालय होते हैं, मुख्य रूप से घरों में। वॉशरूम, सार्वजनिक स्थानों पर पाए जाते हैं, शौचालय और हाथ धोने के लिए; नहाने की सुविधा नहीं।

Web Title : Bathroom vs. Washroom: Know the Key Differences Now!

Web Summary : Bathrooms are for bathing, often with showers and toilets, mainly in homes. Washrooms, found in public places, are for toilets and washing hands; no bathing.