सूर्य अचानक गायब झाला तर काय होईल, मनुष्य गोठतील की ग्रह एकमेकांना भिडतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:27 IST2025-08-20T15:26:29+5:302025-08-20T15:27:31+5:30

Interesting Facts : केवळ सगळीकडे अंधार पडेल असा विचार करत असाल तर चुकताय. बरं यासाठी आपण हे पाहुयात की, जर सूर्य एक आठवडा जरी गायब झाला तर काय होईल.

What if the sun disappeared for one week you should know | सूर्य अचानक गायब झाला तर काय होईल, मनुष्य गोठतील की ग्रह एकमेकांना भिडतील?

सूर्य अचानक गायब झाला तर काय होईल, मनुष्य गोठतील की ग्रह एकमेकांना भिडतील?

Interesting Facts : सकाळी दिवस निघाला आणि सूर्याची किरणं डोळ्यांवर पडल्यावर जे वाटतं ते दुसरं कशातही वाटत नाही. सूर्याची किरणं अंगावर पडणं हे आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं. कारण त्यातून आपल्याला व्हिटामिन डी मिळतं. दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सूर्यकिरणांशिवाय आपण जीवनाचा विचारही करू शकत नाही. पण समजा जर सूर्य गायब झाला तर काय होईल? केवळ सगळीकडे अंधार पडेल असा विचार करत असाल तर चुकताय. बरं यासाठी आपण हे पाहुयात की, जर सूर्य एक आठवडा जरी गायब झाला तर काय होईल.

पहिली गोष्ट

पृथ्वी सतत फिरत असते. जेव्हा पृथ्वीचा एखादा भाग सूर्याकडे असतो तेव्हा तिथे दिवस असतो आणि जेव्हा तो भाग सूर्यापासून दूर जातो, तेव्हा तिथे अंधार असतो. सायन्सच्या काही रिपोर्टनुसार, सूर्य गायब झाल्यावर सगळ्यात आधी आपल्याला थंडी आणि अंधाराचा सामना करावा लागेल. जेव्हा सूर्य पृथ्वीपासून गायब होईल, तेव्हा त्यानंतर 8.5 मिनिटांनी पूर्ण पृथ्वीवर अंधार पडेल.

दुसरी गोष्ट

सूर्य जेव्हा गायब होईल तेव्हा पृथ्वी पूर्णपणे थंड होईल. ज्यानंतर तापमान जवळपास एका आठवड्यात 0 ते मायनस 17.8 डिग्री सेल्सिअस इतकं खाली येईल. ज्यामुळे थंडी वाढेल, हे इतकंही नसेल की, मनुष्य गोठतील. पण जर असं जास्त काळ चालत राहिलं तर एनर्जी कमी झाल्यानं मनुष्य किंवा इतर प्राण्यांचं जगणं मुश्किल होईल.

तिसरी गोष्ट

जर सूर्य गायब झाला तर झाडं-झुडपांच्या प्रकाशासंबंधी अनेक क्रिया बंद पडतील. ज्यामुळे झाडं जगणं अवघड होईल आणि त्यांवर अवलंबून असणाऱ्या जीवांचं देखील जगणं अवघड होईल. अनेक जीव नष्ट होतील.

चौथी गोष्ट

सूर्य जर काही दिवसांसाठीही गायब झाला तर सगळ्यात मोठा प्रभाव अंतराळात पडेल. सूर्याच्या गरूत्वाकर्षण बलावर पृथ्वी सौर मंडळात कायम आहे. जर सूर्य गायब झाला तर पृथ्वी अंतराळात तरंगू लागेल. अशात पृथ्वी अनेक उल्कापिंड किंवा इतर ग्रहांना जाऊन भिडेल. याचा काय परिणाम होईल याचा अंदाज आपणच लावा.

Web Title: What if the sun disappeared for one week you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.