इथे मृत्यूनंतर बाळांना ना अग्नि देतात, ना जमिनीत पुरतात...थेट झाडाच्या खोडात ठेवलं जातं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:38 IST2026-02-24T14:36:46+5:302026-02-24T14:38:04+5:30

Interesting Facts : इंडोनेशियातील घनदाट जंगल आणि उंच डोंगरांमध्ये वसलेला ताना टोराजा भाग तर रहस्यांचा खजिना मानला जातो. येथील टोराज कबिल्यांमध्ये राहणारे लोक मृत्यूला अंत नाही तर एका नव्या जीवनाची सुरूवात समजतात.

Weird tradition of Indonesian tribe children body stuffed in tree bark for long life | इथे मृत्यूनंतर बाळांना ना अग्नि देतात, ना जमिनीत पुरतात...थेट झाडाच्या खोडात ठेवलं जातं, कारण...

इथे मृत्यूनंतर बाळांना ना अग्नि देतात, ना जमिनीत पुरतात...थेट झाडाच्या खोडात ठेवलं जातं, कारण...

Interesting Facts : इंडोनेशियातील कितीतरी गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. सोशल मीडियावर तर इंडोनेशियातील अजब अजब प्रथा किंवा गोष्टी दाखवणारे कितीतरी व्हिडीओ आहेत. येथील आदिवासी लोकांच्या अनोख्या आणि विचित्र प्रथा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. येथील घनदाट जंगल आणि उंच डोंगरांमध्ये वसलेला ताना टोराजा भाग तर रहस्यांचा खजिना मानला जातो. येथील टोराज कबिल्यांमध्ये राहणारे लोक मृत्यूला अंत नाही तर एका नव्या जीवनाची सुरूवात समजतात. पण त्यांच्यातील सगळ्यात धक्का देणारा रिवाज लहान मुलांच्या मृत्यूनंतरचा आहे. जर एखादं ६ ते ९ महिन्याचं बाळ दगावलं तर कुटुंबिय त्याला ना अग्नि देत, ना त्याला कुठे पुरतात. यासाठी ते वेगळा पर्याय निवडतात. 

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, मृत लहान मुलाला चक्क जिवंत झाडाच्या खोडात पुरलं जातं. या प्रथेला ‘पासिलिरान’ किंवा ‘बेबी ट्री बुरियल’ असं म्हणतात. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. टोराज लोक जे सुलावेसी बेटावर राहतात, त्यांच्या काही प्रथा ख्रिश्चन धर्माशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यांच्यानुसार, मृत्यू हळूहळू होतो. जोपर्यंत अंत्यसंस्कार होत नाही, तोपर्यंत मुलांचा आत्मा गावात भटकत राहतो. पण बाळांसाठी हा रिवाज वेगळा आहे.

कसा करतात हा अंत्यसंस्कार? 

मृत्यूनंतर कुटुंबिय बाळाला एका मुलायम कापडात गुंडाळतात. नंतर तर्रा नावाच्या एका झाडाची निवड केली जाते. या झाडाचा पांढरा रस हा आईच्या दुधाच्या मानला जातो. झाडाच्या वरच्या भागात खोडामध्ये एक छिद्र केलं जातं. हे छिद्र उभ्या आकाराचं असतं. यात बाळाला सरळ उभं करून ठेवलं जातं. हे छिद्र काही पानं किंवा बांबूच्या मदतीने सील केलं जातं. काळानुसार झाडाचं खोड भरलं जातं आणि बाळाचं शरीर त्यात विलीन होतं. अशी मान्यता आहे की, अशाप्रकारे बाळ निसर्गाचा भाग बनतं. मृत्यू जीवनात बदलतो. हवा बाळाची आत्मा परलोकात घेऊन जाते आणि झाडाचं वाढणं बाळाच्या नव्या जीवनाचं प्रतीक मानलं जातं.


गावात कितीतरी 'बेबी ट्री' 

कम्बिरा गावातील हे 'बेबी ट्री' आजही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच झाडाच्या खोडात अनेक बाळांच्या कबरी होऊ शकतात. पण ही प्रथा बरीच कमी झाली आहे. आधुनिकीकरण आणि सरकारच्या नियमांमुळे शेवटची ही प्रथा ५० वर्षांआधी पार पाडली गेली होती. तरी आजही टोराजा संस्कृतीमध्ये मृत्यूचा सन्मान मोठा आहे. मोठ्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये म्हशीचा बळी, नाच-गाणं आणि अनेक महिने तयारी केली जाते. मृतकांना गुहांमध्ये किंवा डोंगरांमध्ये दफन केलं जातं. इतकंच काय तर ममीना वर्षातून एकदा धुतात सुद्धा. पण बाळांसाठी झाडांची निवड केली जाते.

Web Title : इंडोनेशिया की अनोखी जनजाति: शिशुओं को मृत्यु के बाद पेड़ों में दफनाते हैं

Web Summary : इंडोनेशिया के ताना तोराजा में, मृत शिशुओं को दफनाने या दाह संस्कार करने के बजाय पेड़ के तनों के अंदर रखा जाता है. यह 'बेबी ट्री बरियल' उन्हें प्रकृति का हिस्सा बनने की अनुमति देता है. पेड़ का रस माँ के दूध का प्रतीक है, जो बच्चे को परलोक में जाने में मदद करता है. यह प्रथा दुर्लभ होती जा रही है.

Web Title : Unique Indonesian tribe buries babies in trees after death: Reason

Web Summary : In Indonesia's Tana Toraja, deceased babies are placed inside tree trunks instead of burial or cremation. This 'Baby Tree Burial' allows them to become part of nature. The tree's sap symbolizes mother's milk, facilitating the child's transition into the afterlife. This practice is becoming rare.