बाबो! 'ही' आहे जगातली सर्वात मोठं तोंड असलेली महिला, एका व्हिडीओतून करते लाखोंची 'तोंडफाड' कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 11:32 IST2020-12-31T11:23:32+5:302020-12-31T11:32:49+5:30

आज आम्ही तुम्हाला सामंथा रामस्डेलच्या अनोख्या टॅलेंटबाबत सांगणार आहोत. सामंथाच्या टॅलेंचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Weird talent of woman with worlds biggest mouth earns 11 lakh rupees per video | बाबो! 'ही' आहे जगातली सर्वात मोठं तोंड असलेली महिला, एका व्हिडीओतून करते लाखोंची 'तोंडफाड' कमाई!

बाबो! 'ही' आहे जगातली सर्वात मोठं तोंड असलेली महिला, एका व्हिडीओतून करते लाखोंची 'तोंडफाड' कमाई!

असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खास टॅलेंट असतं किंवा खासियत असते. त्यांची तिच खासियत त्यांना इतरांपासून वेगळं बनवते. पण त्या व्यक्तीला गरज आपल्यातील टॅलेंट ओळखण्याची आणि ते बाहेर आणण्याची. जगात काही असे लोक आहेत ज्यांची खासियत पाहून कुणीही हैराण होतं. आज आम्ही तुम्हाला सामंथा रामस्डेलच्या अनोख्या टॅलेंटबाबत सांगणार आहोत. सामंथाच्या टॅलेंचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

स्टॅमफोर्डमध्ये राहणारी सामंथा रामस्डेल ही तिच्या अजब टॅलेंटमुळे चर्चेत आली आहे. ३० वर्षांची सामंथा तिच्या तोंडामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सामंथाला जगातली सर्वात मोठं तोंड असलेली महिला असा अवॉर्ड देण्यात आला आहे. बसला ना धक्का? पण ही बाब कोरोना व्हायरससारखी खरी आहे.

सामंथा रामस्डेल तिच्या तोंड फाडण्याच्या टॅलेंटमुळे भरमसाठ कमाई करत आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, सामंथाला तोंड उघडण्याच्या एका व्हिडीओच्या बदल्यात ११ लाख रूपये मिळतात.

सामंथाने सांगितले की, तिला सिंगिंग आणि अॅक्टिंगची फार आवड होती. आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहचवण्याठी तिने टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करायला सुरूवात केली होती. पण काही दिवसातच तिच्या असं लक्षात आलं की, लोक तिच्या सिंगिंग आणि अॅक्टिंगऐवजी तिच्या तोंडाच्या साइजबाबत अधिक बोलत आहेत. यानंतर ती तोंड फाडून व्हिडीओ तयार करू लागली आणि लोकांना हे व्हिडीओ खूप पसंत पडू लागले होते.

सामंथाने दावा केला आहे की कोरोनामुळे लॉकडाऊन दरम्यान तिला ७ लाख ४० हजार फॉलोअर्स मिळाले. आता ती तोंड फाडून खूप पैसा कमावत आहे. सामंथा ही स्टॅमफोर्डमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव आहे.
 

Web Title: Weird talent of woman with worlds biggest mouth earns 11 lakh rupees per video