चंद्रावर गेल्यावर 84 किलो वजनाच्या व्यक्तीचं वजन किती होईल? वाचून व्हाल अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:00 IST2023-06-19T13:00:14+5:302023-06-19T13:00:49+5:30
Earth Vs Moon Weight Comparison : पृथ्वीच्या जवळ असलेला चंद्र आणि सूर्य यांचेही रहस्य हळूहळू समोर येत आहेत. 20 जुलै 1969 मध्ये मनुष्याने पहिल्यांदा चंद्रावर पाउल ठेवलं. चला जाणून घेऊ या घटनेचा अनुभव....

चंद्रावर गेल्यावर 84 किलो वजनाच्या व्यक्तीचं वजन किती होईल? वाचून व्हाल अवाक्....
Earth Vs Moon Weight Comparison : ब्रह्मांडात वेगवेगळं विश्व आहे. पृथ्वीशिवाय अंतराळात अनेक ग्रह आहेत. त्या ग्रहांचं रहस्य उलगडण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत करत आहेत. पृथ्वीच्या जवळ असलेला चंद्र आणि सूर्य यांचेही रहस्य हळूहळू समोर येत आहेत. 20 जुलै 1969 मध्ये मनुष्याने पहिल्यांदा चंद्रावर पाउल ठेवलं. चला जाणून घेऊ या घटनेचा अनुभव....
जर एखादी व्यक्ती चंद्रावर गेली तर त्यांना वजनात बदल झालेलं जाणवतं. हे सत्य आहे. चंद्रावर पोहोचून वजन इतकं कमी होतं ज्याचा कुणी विचारही केला नसेल. तर आता तेच जाणून घेऊ की, चंद्रावर गेल्यावर मनुष्याच्या वजनात काय बदल होतो आणि त्यांचं वजन किती कमी होतं.
हे तर तुम्हाला समजलं असेल की, चंद्रावर गेल्यावर व्यक्तीचं वजन कमी होतं. चंद्रावर गेल्यावर तुमचं वजन फार कमी होतं. एका रिपोर्टनुसार, जर पृथ्वीवर तुमचं वजन 84 किलो असेल तर चंद्रावर जाऊन तुमचं वजन 14 किलो होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं का होतं? चला तेही जाणून घेऊ.
हे सगळं Gravity मुळे होतं. चंद्राचं ग्रॅव्हीटेशनल एसेलेरेशन पृथ्वीच्या तुलनेत 1/6 असतं. याच कारणाने इथे मनुष्याचं वजन पृथ्वीच्या तुलनेत 1/6वा भाग असतं. चंद्रावर पोहोचल्यावर अंतराळवीरांना त्यांचं वजन सहा पटीने कमी वाटतं. चंद्रावर गेल्यावर शरीरात कमी होतं असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. मुळात द्रव्यमान आणि भार दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. भार एकप्रकारचा फोर्स असतो. द्रव्यमान चंद्रावर पोहोचल्यावर तेवढंच राहतं. पण वजन कमी झाल्याचं तुम्हाला जाणवेल.