Video : नाद करायचा नाय!; नववधुची 'कसरत' पाहून नवरदेव नक्कीच झाला असेल गपगार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:26 IST2021-08-03T18:25:52+5:302021-08-03T18:26:22+5:30
लग्नसोहळ्यात तुम्ही नवरीला डान्स करताना, उखाणा घेताना, बाईक- ट्रॅक्टरवरून एन्ट्री घेताना पाहिलं असेल, परंतु...

Video : नाद करायचा नाय!; नववधुची 'कसरत' पाहून नवरदेव नक्कीच झाला असेल गपगार!
कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे आपल्यापैकी काहींना आळशी नक्की बनवलं असेल, तर काहींनी शारीरिक तंदुरूस्ती महत्त्वाची आहे, हे जाणले असेल. ज्यांना तंदुरुस्तीचे महत्त्व समजले त्यांनी सोडा, पण अजूनही ज्यांना तंदुरुस्ती किती महत्त्वाची आहे हे कळले नसावे, त्यांना हा व्हिडीओ नक्की प्रेरणा देईल... सोशल मीडियावर हा व्हिडीओ नुसता धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत लग्नाचा ड्रेस घालून नववधू पुश-अप्स मारताना दिसत आहेत. लग्नसोहळ्यात तुम्ही नवरीला डान्स करताना, उखाणा घेताना, बाईक- ट्रॅक्टरवरून एन्ट्री घेताना पाहिलं असेल, परंतु असे पुश-अप्स घेणारी वधू पहिल्यांदाच पाहिली असेल.
आना अरोरा हिनं हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्याच्यावर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
आना ही मॉडल असून तिचे ७८ हजार फॉलोअर्स आहेत. तिनं तिच्या सोशल मीडियावर फिटनेसचे धडे देणारे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पण, या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.