घरात सुरू होतं रिनोव्हेशन, बाथटबमध्ये सापडली अशी वस्तू मजूर पळून गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 10:57 IST2024-01-24T10:55:20+5:302024-01-24T10:57:31+5:30

घराचं रिनोव्हेशन काम करत असताना ठेकेदाराने जेव्हा बाथरूममधील बाथटब सरकवला तेव्हा त्याला एक बॉक्स आढळला.

Washington contractor remodeling bathroom finds grenade behind bathtub | घरात सुरू होतं रिनोव्हेशन, बाथटबमध्ये सापडली अशी वस्तू मजूर पळून गेले...

घरात सुरू होतं रिनोव्हेशन, बाथटबमध्ये सापडली अशी वस्तू मजूर पळून गेले...

अनेकदा लोकांना जुन्या घरांचं रिनोव्हेशन करताना अशा काही वस्तू सापडतात ज्या बघून ते हैराण होतात. अनेकदा बघण्यात आलं की, लोकांना जुन्या घराच्या भिंतीत शेकडो वर्ष जुनी बॉटल सापडते तर कधी काही खजिना मिळतो. अशा गोष्टी बघून लोक अवाक् होतात. पण नुकतंच जुन्या घराच्या बाथरूममध्ये जे सापडलं ते बघून लोक घराच्या बाहेर पळाले.

वॉशिंग्टनमध्ये घराचं रिनोव्हेशन काम करत असताना ठेकेदाराने जेव्हा बाथरूममधील बाथटब सरकवला तेव्हा त्याला एक बॉक्स आढळला. या बॉक्समध्ये जे दिसलं ते बघून ठेकेदाराला घाम फुटला.

या बॉक्समध्ये एक ग्रेनेड म्हणजे हात बॉम्ब होता. पोलर बिअर कंस्ट्रक्शनचा मालक वादिम खारखवी म्हणाला की, त्याने सियाटेलच्या बॅलार्डमध्ये घराच्या तिसऱ्या मजल्यावर बाथटबमध्ये लपवलेल्या एका बॉक्समध्ये बॉम्ब पाहिला. तेव्हा विचार आला की, इथून पळून जावं.

तो तिथून पळूनही गेला आणि पुन्हा परत आला. तेव्हा त्याने त्याचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ त्याने कंपनीच्या टिकटॉकवर शेअर केला. 

ते म्हणाले की, मी तिथून घाबरून पळून गेलो. बाहेर जाऊन श्वास घेतला आणि परत आत गेलो. त्याचा व्हिडीओ बनवला. मी फोनला झूम इन केलं आणि बॉम्बला जवळून पाहिलं. नंतर पोलिसांना याची माहिती दिली. बॉम्ब अॅक्टिव नव्हता.

Web Title: Washington contractor remodeling bathroom finds grenade behind bathtub