विना इन्शुरन्स चालवत होता कोट्यवधींची कार; ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:56 IST2022-03-14T14:55:14+5:302022-03-14T14:56:29+5:30
जेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं तेव्हा ही कार कोट्यवधींची आहे यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.

विना इन्शुरन्स चालवत होता कोट्यवधींची कार; ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं आणि मग...
तुम्ही गाडी चालवता तेव्हा तुम्ही गाडीचे सर्वच पेपर सोबत ठेवत असाल. गाडीचा इन्शुरन्स, पीयुसीसारख्या गोष्टी कायमच आपण सोबत ठेवत असतो. परंतु एक अजब घटना समोर आली आहे. कोट्यधीश सोशल मीडिया स्टारची गोल्डन मॅक्लरेन कार ब्रिटनच्या पोलिसांनी जप्त केली. यासाठी कारणही तसंच होतं. गाडीचा इन्शुरन्सच काढला नसल्यानं ही कार जप्त करण्यात आली. कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव पुयान मोख्तारी असं असं आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ६० लाख फॉलोअर्सही आहेत.
त्याच्या मॅक्लेरन सेन्ना कारची किंमत साडेसात कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रॅफिक पोलिसांनी त्याला २५ फेब्रुवारी रोजी डोव्हरमध्ये थांबवलं होतं. द सनच्या रिपोर्टनुसार पुयान मोख्तारी ३१ वर्षांच्या असून तू मूळ ईराणचा नागरिक आहे. याशिवाय त्याची एकूण संपत्ती १ अब्ज ८८ लाखांपेक्षा अधिक आहे. असं असलं तरी त्यानं मात्र आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढला नव्हता.
सनच्या रिपोर्टनुसार या महाग़ड्या कारचा टॉप स्पीड ३३४ किमी प्रति तास आहे. ब्रिटनमध्ये एका ठिकाणी जाताना त्याला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी पोलिसांन त्याला थांबवलं तेव्हा या कारची किंमत कोटींमध्ये आहे, यावर पोलिसांना विश्वासच बसला नाही. ही कार जवळपास आठवडाभर यार्डमध्ये होती. त्यानंतर ही कार पिक अप करण्यात आली. मोख्तारीनं रविवारी कार घेण्यासाठी ट्रक पाठवला होता. नंतर ही कार पॅरिसला आणण्यात आली. पॅरिसला आणल्यावर त्यानं या कारसोबत फोटोही काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याला चॅनल टनल टर्मिनलकडे थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्याकडे इन्शुरन्स नव्हता. यानंतर कारवाई करत त्याची कार जप्त करण्यात आली होती.