Want to be neighbours with hollywood star Sylvester Stallone buy this home in Beverly hills | हॉलिवूड स्टार 'रॅम्बो'चा शेजारी होण्याची सुवर्णसंधी; 'या' बंगल्याचा होतोय लिलाव, किंमत वाचून चक्रावून जाल....

हॉलिवूड स्टार 'रॅम्बो'चा शेजारी होण्याची सुवर्णसंधी; 'या' बंगल्याचा होतोय लिलाव, किंमत वाचून चक्रावून जाल....

हॉलिवूड अभिनेता सिलवेस्टर स्टॅलनच्या फॅन्सना त्याचा शेजारी होणारी शानदार संधी आली आहे. पण ही संधी मिळवण्यासाठी फॅन्सना त्यांचा खिसा चांगलाच रिकामा करावा लागणार आहे. बेवर्ली हिल्स हे हॉलिवूडच्या टॉप स्टार्सचं घर आहे. इथे अनेक मोठे स्टार्स राहतात आणि इथेच सिलवेस्टर स्टॅलन याचाही बंगला आहे. सिलवेस्टर स्टॅलनच्या शेजारी असलेल्या एका बंगल्याचा लिलाव होणार आहे. जो कुणी हा बंगला घेईल त्याला हॉलिवूड स्टारचा शेजारी होता येईल.

बेवर्ली हिल्समध्ये प्रॉपर्टीचे भाग आकाशाला भिडले आहेत. कारण इथे हॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स राहतात. इथे एखादा बंगला रिकामा असेल तर तो खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी स्पर्धा होते. तसं इथे घर घेण्याचं स्वप्न सर्वसामान्य व्यक्ती बघूही शकत नाही. कारण येथील बंगल्यांवर लागणारी बोली ऐकून चक्रावून जातील.

ज्या व्हिलाचा लिलाव होणार आहे त्यात एकूण १३ बेडरूम आणि २५ बाथरूम आहेत. एकूण ९ एकर परिसरात हा व्हिला तयार करण्यात आला आहे. आणि इथे पोहोचण्यासाठी प्रायव्हेट रस्ताही तयार केला आहे. इथे पार्टी करण्यासाठीही मोठी जागा आहे. पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांना इथे काहीही समस्या होणार नाही. कारण व्हिलामध्ये अनेक गेस्ट हाउस आहेत. हा व्हिला आर्किटेक्ट हेब्लिंस्कीने डिझाइन केला आहे. 

लिलाव करणाऱ्या कंपनीने सांगितले की, हा व्हिला केवळ घर नाही तर ऑथेंटिक इटालियन व्हिलेज आहे. यात स्वीमिंग पूल, जॉगिंग ट्रेल, पूल हाउस, जकूजी, टेनिस कोर्ट आणि ३० कार्ससाठी एक कोर्टयार्ड आहे. आता इतकं सगळं आहे म्हटल्यावर कुणालाही उत्सुकता वाटते की, या घराची किंमत किती असेल. तर या व्हिलाची सुरूवातीची बोली १६० मिलियन अमेरिकन डॉलर(११७३ कोटी रूपये) इतकी ठेवण्यात आली आहे.
 

Web Title: Want to be neighbours with hollywood star Sylvester Stallone buy this home in Beverly hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.