कार पार्किंगमध्ये 6 महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 10:10 IST2023-11-10T10:07:23+5:302023-11-10T10:10:00+5:30

Viral Video : भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VideosIrish नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

Viral Video : women fight with each other in car parking watch video | कार पार्किंगमध्ये 6 महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

कार पार्किंगमध्ये 6 महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत काही तरूणी एकमेकींना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. यात साधारण 6 तरूणी एकमेकींचे खेचताना, मारहाण करताना दिसत आहेत. तर आजूबाजूला असलेले लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्या काही ऐकत नाहीत. सगळ्या तरूणी आउट ऑफ कंट्रोल होऊन मारहाण करत आहेत. भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VideosIrish नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओच्या सुरूवातील दोन महिलांना भांडण करताना बघू शकता. त्या एकमेकींच्या अंगावर बसून मारहाण करत आहेत. तर दुसरी एकीचे केस धरून तिला खेचत आहे. तेव्हाच तिथे असलेल्या दुसऱ्या महिलाही एकमेकींशी भांडणं सुरू करतात. आजूबाजूला बरेच लोकही जमा होता.

मागे उभे असलेले काही लोक महिलांना चीअर करतानाही दिसत आहेत. ते ही घटना फोनमध्ये रेकॉर्ड करत आहेत. म्हणजे यातून हे दिसतं की, त्यांनीच या भांडणाचं आयोजन केलं होतं. पण हे अजून स्पष्ट झालं नाही.

अशात इथून जात असलेली एक व्यक्ती भांडण थांबवतो. तो तिथे येताच बाकीचे लोकही निघून जातात. तो जमिनीवर पडलेल्या दोन महिलांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. काही अंतरावर चार महिलाही अशाच भांडत आहेत. मग एक महिला येते आणि चारही महिलांना भांडण थांबवण्यास सांगते. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. 

Web Title: Viral Video : women fight with each other in car parking watch video