Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:05 PM2020-07-18T12:05:41+5:302020-07-18T12:07:53+5:30

एका महिला अ‍ॅंकरसोबत लाइव्ह शो दरम्यान  विचित्र घटना घडली, पण ती जराही न अडखळता तिने शो सुरूच ठेवला. या अ‍ॅंकर शोदरम्यान अचानक दात निघाला

Viral video when ukraine news anchors tooth falls out on live air show | Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....

Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....

Next

पेशन्स मीडियामध्ये फार गरजेचे आहेत. ते म्हणतात ना 'शो मस्ट गो ऑन' म्हणजे काहीही झालं तरी शो सुरू राहिला पाहिजे. एका महिला अ‍ॅंकरसोबत लाइव्ह शो दरम्यान  विचित्र घटना घडली, पण ती जराही न अडखळता तिने शो सुरूच ठेवला. या अ‍ॅंकर शोदरम्यान अचानक दात निघाला, पण ती थांबली नाही.

युक्रेनची पत्रकार Maricha Padalko ने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ती एका लाइव्ह शोदरम्यान कोरोना व्हायरसबाबत अपडेट देत होती. तेव्हाच अचानक तिचा एक दात बाहेर निघाला. अशात ती जराही न डगमगता शांत राहिली आणि काम सुरूच ठेवलं. तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये तिने लिहिले की, लाइव्ह ब्रॉडकास्टिंग यासाठी अद्भूत आहे. कारण त्यात काहीही होऊ शकतं'.

तिने हेही सांगितले की, गेल्या २ वर्षांच्या करिअरमध्ये तिच्यासोबत असं कधी झालं नाही. तिचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला. Maricha ने सांगितले की, तिचा हा दात साधारण १० वर्षांआधी तुटला होता. तीन मुलांची आई असून तिची आई अलार्म घड्याळासोबत खेळत होती. ती घड्याळ चुकून तिच्या दाताला लागली होती. लोकांना सकारात्मक संदेश देण्यासाठी तिच्या चॅनेलने एक फोटोही शेअर केलाय, ज्यात तिने दात फिक्स केलेला दाखवलं आहे. याचं कॅप्शन आहे 'आजमध्ये जगा उद्यात नाही'.

Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!

बाबो! आज घरबसल्या महिन्याला ७५ लाख रूपये करते कमाई, कधी 'या' कारणाने आत्महत्येचा करत होती विचार!

Web Title: Viral video when ukraine news anchors tooth falls out on live air show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.