OMG! झाडावर असा काही कुंडली मारत चढला साप की, बघणाऱ्यांना फुटला घाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:46 PM2020-07-28T12:46:04+5:302020-07-28T12:51:15+5:30

यात तुम्ही बघू शकता की, एक पायथन साप कुंडली मारत मारत नारळ्या झाडावर चढतो. हा नजारा खरंच धडकी भरवणाराच आहे.

Viral video : When python snake climb tree, people goes crazy | OMG! झाडावर असा काही कुंडली मारत चढला साप की, बघणाऱ्यांना फुटला घाम!

OMG! झाडावर असा काही कुंडली मारत चढला साप की, बघणाऱ्यांना फुटला घाम!

googlenewsNext

साधारणपणे बऱ्याच लोकांना प्रत्यक्षात तर सोडाच पण सापाचा व्हिडीओ जरी पाहिला तरी भीती वाटते. असाच एक मनात धडकी भरवणारा आणि थरकाप उडवणारा सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्ही सापांना अनेकदा झाडावर चढताना पाहिले असेल. पण बेट लावून सांगू शकतो की, या व्हिडीओत ज्याप्रमाणे साप झाडावर चढतो तसा काही प्रकार तुम्ही पाहिला नसेल. यात तुम्ही बघू शकता की, एक पायथन साप कुंडली मारत मारत नारळ्या झाडावर चढतो. हा नजारा खरंच धडकी भरवणाराच आहे.

आयएएस डॉ. सुनिता मिश्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'पामच्या झाडावर सरकत चढणाऱ्या सापाचा व्हिडीओ मंत्रमुग्ध करणारा आहे'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत याला ३३ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. काही लोकांनी तर लिहिले की, त्यांना भीती वाटली हा व्हिडीओ पाहून. तर काही म्हणाले की, सापाला अशाप्रकारे झाडावर चढताना कधी पाहिले नाही.

यात तुम्ही बघू शकता की, एक पायथन सरळ असलेल्या झाडावर एका वेगळ्याच स्टाइलने चढत आहे. तो आधी कुंडली मारतो आणि मग वर सरकत जातो. असं करत करत तो वर जातो. पण हा नजारा नक्कीच भीतीदायक आहे. लोकांनी आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण असा व्हिडीओ किंवा असा प्रकार करताना सापाला कधी पाहिले नाही. त्यामुळे व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

हे पण वाचा : 

बाप रे बाप! बिबट्यानं केलं असं काही डेरिंग, थेट मगरीच्या तोंडातून हिसकावला तिचा घास आणि...

अरे वाह रे वाह! लोकांपासून 'इतकी' दूर जाऊन बसली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल....

Web Title: Viral video : When python snake climb tree, people goes crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.