Viral Video: 'तिनं' तोंडात घातला 'माऊथ ऑर्गन' अन् असं काही घडलं की... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 12:45 PM2020-02-03T12:45:27+5:302020-02-03T12:52:05+5:30

यापुढे असे काही न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Viral Video: TikTok User Gets Harmonica Stuck In Her Mouth And Has To Seek Medical Help | Viral Video: 'तिनं' तोंडात घातला 'माऊथ ऑर्गन' अन् असं काही घडलं की... 

Viral Video: 'तिनं' तोंडात घातला 'माऊथ ऑर्गन' अन् असं काही घडलं की... 

googlenewsNext

ओन्टारिओ : कॅनडामध्ये आपल्या लहान भावाला हसविण्यासाठी एका मुलीने तोंडात माऊथ ऑर्गन (हार्मोनिका) घातले. त्यानंतर हे माऊथ ऑर्गन तोंडात अडकून बसल्यामुळे तिला थेट डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. 

कॅनडामधील ओन्टारिओमध्ये (Ontario) राहणाऱ्या मौली ओब्रिएन (Mollie O'Brien) हिने आपल्या लहान भावाला हसविण्यासाठी तोंडात माऊथ ऑर्गन घातले. त्यानंतर काही वेळात तिला जाणवले की, तोंडात घातलेले माऊथ ऑर्गन अडकले आहे आणि ते बाहेर निघत नाही. यावेळी तिने लगेच डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, डॉक्टरकडे जाण्याआधी मौलीने एक टिकटॉक व्हिडिओ तयार केला. मौलीचा टिकटॉकवरील हा तिसरा व्हिडीओ आहे. मात्र, या व्हिडीओ आतापर्यंत 1.7 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओला लाईक सुद्धा केले आहे.

@mollieobrien

going to cheo to get my harmonica removed... #foryou#fyp#foryoupage#dissapointment#failure#mymomdoesntloveme#idiot

♬ I just did a bad thing bill wurtz - cameron.tr

मौलीने सांगितले की, "तोंडात माऊथ ऑर्गन अडकल्यामुळे सुरुवातीला 30 मिनिटे जास्त त्रास झाला. त्यानंतर थोडा कमी झाला. माऊथ ऑर्गन अडकल्यामुळे ज्यावेळी मी श्वास घेते होते, त्यावेळी माझ्या तोंडातून विचित्र आवाज येत होता. तसेच, ज्यावेळी मला समजते की, माझ्या तोंडात माऊथ ऑर्गन अडकला, त्यावेळी मी खूप घाबरली होती." 

या घटनेनंतर मौलीच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तिच्या तोंडात अडकलेला माऊथ ऑर्गन बाहेर काढला. तसेच, यापुढे असे काही न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी मौलीला दिला. 

महत्त्वाच्या बातम्या 

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग

महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य

China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं

Coronavirus News: चीनमधून ३२३ भारतीय परतले; दोन मराठी मुलांची मात्र परवड

जामिया विद्यापीठाजवळ पुन्हा गोळीबार, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना

Web Title: Viral Video: TikTok User Gets Harmonica Stuck In Her Mouth And Has To Seek Medical Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.