Viral Video : प्रेमासाठी कायपण! आधी स्वत:ला लावून घेतली आग अन् नंतर गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:18 IST2020-08-12T17:16:11+5:302020-08-12T17:18:51+5:30
Rick Ash असं या व्यक्तीचं नाव असून तो स्टंटमॅन आहे. त्याची गर्लफ्रेन्ड Katrina Dobson ला प्रपोज करण्यासाठी त्याने स्वत:ला आग लावून घेतली होती. हे सगळं तसंच झालं जसे स्टंटमॅन करतात. हे त्याची गर्लफ्रेन्ड कतरिनासाठी सरप्राइज होतं.

Viral Video : प्रेमासाठी कायपण! आधी स्वत:ला लावून घेतली आग अन् नंतर गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज...
अनेकदा गमतीने असं म्हटलं जातं की, माणूस प्रेमात पडल्यावर वेडा होतो. कारण ते प्रेमात काहीही करायला तयार होतात. हे अनेकदा आम्हीही ऐकलं आणि तुम्हीही ऐकलं असेल. पण प्रेमात पडलेल्या एका व्यक्तीला असा कारनामा समोर आलाय, ज्यावर विश्वास बसणार नाही. याने पठ्ठयाने स्वत:ला आग लावून घेतली आणि गर्लफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज केलं.
Rick Ash असं या व्यक्तीचं नाव असून तो स्टंटमॅन आहे. त्याची गर्लफ्रेन्ड Katrina Dobson ला प्रपोज करण्यासाठी त्याने स्वत:ला आग लावून घेतली होती. हे सगळं तसंच झालं जसे स्टंटमॅन करतात. हे त्याची गर्लफ्रेन्ड कतरिनासाठी सरप्राइज होतं.
न्यूयॉर्क टाइम्से यांचा व्हिडीओही शेअर केला आहे. यात बघू शकता की, पूर्ण काळजी घेऊन या व्यक्तीने स्वत:ला आग लावून घेतली. आणि आपल्या गर्लफ्रेन्डला प्रपोज केलं. यावेळी किती काळजी घेतली गेली हेही यात दिसतं. इतकेच नाही तर नंतर आग विझवल्याचेही दाखवण्यात आले आहे.
कॅतरिना ही नर्स आहे. दोघांचीही भेट ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाली होती. ही एक अनोखी जोडी आहे. रिकीची उंची कमी आहे. तर कॅतरिनाची उची ६ फूट ३ इंच इतकी आहे. रिकी प्रपोज करत विचारलं की, तू माझ्याशी लग्न करशील का? यावर कॅतरिनाने लगेच होकार दिला आणि क्रू मेंबर्सनी लगेच आग विझवली.
कॅतरिनाने सांगितले की, जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं होतं तेव्हाच दोघांनी बोलणं सुरू केलं होतं. तीन आठवडे ते बोलत होते. रिकीने कॅतरियानाला खोट सांगून बाहेर नेलं होतं. जिथे त्याने तिला प्रपोज केलं. रिकी हा गेल्या २७ वर्षांपासून स्टंटमॅनचं काम करतोय. म्हणजे रिकीने हे सगळं एक्सपर्टच्या देखरेखीत केलं. तुम्ही हे घरी करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.
हे पण वाचा :
बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!
अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं
कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं