साधेपणा जपणारा कॅप्टन कुल माही; टी-शर्टने साफ केली चाहत्याच्या बाईकवरची धूळ 'Video' व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:25 IST2023-11-30T15:24:11+5:302023-11-30T15:25:46+5:30
सोशल मीडीयावर कोणताही विषय वर्ज्य नाही. एखादी घटना घडली तर क्षणार्धात त व्हायरल केली जाते.

साधेपणा जपणारा कॅप्टन कुल माही; टी-शर्टने साफ केली चाहत्याच्या बाईकवरची धूळ 'Video' व्हायरल
Viral video: प्रसिद्धीच्या उंच शिखरावर मातीशी जुळून राहण्याची कला फार थोडक्याच लोकांना अवगत असते. याचा प्रत्यय या व्हिडिओमधून येतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून भारताचा कॅप्टन कुल माही आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. याआधीही एका चाहतीने धोनीच्या कारचा त्याच्या घरापासून ते अगदी झारखंडच्या विमानतळापर्यंत पाठलाग केला होता. महेंद्रसिंग धोनीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी धोनीने केलेल्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एमएसधोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
आपल्या खेळातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा माही आता चर्चेता विषय बनला आहे. अलीकडेच महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी एका चाहत्याची बाईक आपल्या टी-शर्ट ने धूळ साफ केली. त्यानंतर आपल्या चाहत्याला माहीने ऑटोग्राफ देखील दिला. त्यामुळे माहीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. माहीचा हा साधेपणा अनेकांना भावला आहे.
इंस्टाग्रामवर एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केलाय. एमएस धोनी सर 'TRIUMPH ROCKET 3R' वर ऑटोग्राफ देऊन माझा आनंद द्विगुणीत केला आहे. अशी आशयाची पोस्ट या यूजरने केली आहे. या व्हायरल होणाऱ्या रिलला सोशल मीडीयावर प्रचंड पसंती मिळत आहे. शिवाय आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लाईक्स आणि कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.
येथे पाहा व्हिडीओ :