'या' चिमुकल्याचा डान्स पाहून ग्रँड मास्टर सुद्धा म्हणतील क्या बात...क्या बात.. क्या बात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 15:32 IST2020-02-25T15:25:16+5:302020-02-25T15:32:13+5:30
या चिमुकल्याचा व्हिडीयो पाहून पोट धरून हसाल

'या' चिमुकल्याचा डान्स पाहून ग्रँड मास्टर सुद्धा म्हणतील क्या बात...क्या बात.. क्या बात!
तुम्ही आत्तापर्यंत अनेक लहान चिमुरड्यांना नाचताना पाहिलं असेल. आपल्याच दुनियेत हरवून लहान मुलं नाचत असतात. सध्या सोशल मिडियावर लहान बाळाच्या नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ६ महिन्यांच्या जवळपास या चिमुकल्याचं वय असेल पण त्याने असा डान्स केला आहे. हा डान्स पाहून माईकल जॅक्सनने सुद्धा टाळ्या वाजवल्या असत्या.
Rex Chapman या व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीयो सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या बाळाने व्हिडीओत गाडीत बसून सिटबेल्ट लावला आहे. ( हे पण वाचा-२४ वर्ष लहान मेलेनियाच्या प्रेमात कसे पडले ट्रम्प? जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी!)
Some people are born with it... pic.twitter.com/dvdvi2CJXb
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) February 22, 2020
या व्हिडीओला सोशल मिडीयावर ४३ लाखांपेक्षा जास्त विव्हज् मिळाले आहेत. या बाळाला नाचताना पाहून अनेकांनी कंमेंट्स दिल्या आहेत. ( हे पण वाचा-Toilet मध्ये पडली कारची चावी, त्याने काढण्यासाठी हात टाकला आणि दीड तास बोंबलत बसला!)