शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

बाबो! महिन्याला तीन लाख कमावणारे ‘बदक’; बड्या सेलिब्रेटींना देतंय टक्कर, काय आहे खास? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 5:41 AM

अमेरिकन मालकीण असलेल्या या बदकाचे टिकटॉकवर जगभरातील मिळून २.७ मिलियन इतके प्रचंड ’फॉलोअर्स’ आहेत.

आजकाल आपल्या आसपासच्या अनेकांच्या पगाराची वर्षाची पॅकेज बघून आपले डोळे विस्फारत असतात. अगदी देशात नोकरी करून देखील हे लोक मुबलक पगार कमावत असतात. काही हरहुन्नरी लोक तर सोशल मीडियाच्या मदतीने देखील लाखोंची कमाई करत असतात. कोणी कुकरी शो चालवत असतो, कोणी विविध स्ट्रीट फूडची माहिती देत असतो, कोणी ऑनलाईन शिकवण्या घेत असतो तर, कोणी विविध पर्यटन स्थळांची माहिती देत असतो. मात्र अशा अनेक प्रसिद्ध ’सोशल स्टार’ ना सध्या एक बदक चांगली टक्कर देत आहे. माणसांपेक्षा देखील जास्त प्रसिद्ध असलेल्या या टिकटॉक स्टार बदकाचे वर्षाचे उत्पन्न तब्बल पन्नास हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे ३७ लाख रुपये आहे.

अमेरिकन मालकीण असलेल्या या बदकाचे टिकटॉकवर जगभरातील मिळून २.७ मिलियन इतके प्रचंड ’फॉलोअर्स’ आहेत. या बदकाचे नाव Munchkin आहे, तर याच्या मालकिणीचे नाव आहे क्रिसी एलिस. Munchkin बदकाचे  इंस्टाग्रामवर देखील एक खाते आहे.Dunkin Ducks नावाने हे खाते असून, Munchkin तिथे देखील खूप लोकप्रिय आहे. Munchkin ची  मालकीण क्रिसी एलिस सांगते की, पेनेसेल्वियामध्ये ‘Dunkin Donuts’ नावाची एकमेव फास्ट फूड चेन होती. या नावावरूनच तिला Munchkin च्या इंस्टाग्राम अकाउंटचे नाव सुचले. एलिसला वयाच्या १६ व्या वर्षी पासून पाळीव प्राण्यांचा अत्यंत लळा लागला होता. या काही पाळीव प्राण्यांना घेऊन ती शाळेत देखील जात असे. मात्र तिच्या या पाळीव प्राणी प्रेमाची शाळेतील सहकारी प्रचंड थट्टा उडवत असत, तिला सतत टोमणे मारत असत. या सगळ्याला कंटाळून शेवटी तिने ’Munchkin’ साठी ‘Dunkin Donuts’ हे चॅनल चालू केले.

अल्पावधीत या चॅनलला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चॅनेलमुळे आज एलिस महिन्याला ४,५०० डॉलर्स अर्थात ३ लाख ३० हजार रुपयांची कमाई करते. आज अमेरिकेत एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये आठवड्यातील ४० तास काम करून जेवढी कमाई होते, तेवढी एलिस या चॅनेलच्या मदतीने फक्त अर्ध्या तासात करते असा तिचा दावा आहे. तिच्या या चॅनेलला अनेक प्रायोजक मिळालेले असून, त्यांच्या जाहिराती मधून दिवसेंदिवस तिची कमाई वाढतच चालली आहे. एखाद्या वेडापायी थट्टा मस्करी झाल्याने निराश होणाऱ्या लोकांसाठी, जगाची पर्वा न करता आपल्या ध्येयाकडे कशी वाटचाल करावी, याचे एलिस हे एक आदर्श उदाहरण आहे.

प्रसाद ताम्हनकर

prasad.tamhankar@gmail.com

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकSocial Mediaसोशल मीडिया