क्या बात! यातील कोण आई आणि कोण मुलगी, फोटो बघून ओळखणं झालं कठिण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 18:34 IST2021-08-05T17:58:12+5:302021-08-05T18:34:41+5:30

शेरिल जारविस एक फिटनेस ट्रेनर आहे. तिचं वय ४१ वर्षे आहे. तिच्या मुलीचं नाव लॉरेन मार्सडेन आहे. तिचं वय २१ वर्षे आहे.

Viral photo of mother daughter duo surprising people | क्या बात! यातील कोण आई आणि कोण मुलगी, फोटो बघून ओळखणं झालं कठिण

क्या बात! यातील कोण आई आणि कोण मुलगी, फोटो बघून ओळखणं झालं कठिण

आई-मुलींच्या अनेक जोड्यांमध्ये बहिणी किंवा मैत्रिणींसारखं प्रेम असतं. त्या एकमेकांच्या फार जवळ असतात आणि नेहमीच एकसारखे कपडेही घालतात. अलिकडे सोशल मीडियावर एका आई-मुलीच्या जोडीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. Cheryl Jarvis आणि Lauren Marsden म्हणायला तर आई-मुलगी आहे, पण दोघी दिसतातही एकसारख्या.

शेरिल जारविस एक फिटनेस ट्रेनर आहे. तिचं वय ४१ वर्षे आहे. तिच्या मुलीचं नाव लॉरेन मार्सडेन आहे. तिचं वय २१ वर्षे आहे. दोघीत आई आणि मुलीचं नातं असलं तरी शेरिल कोणत्याही प्रकारे लॉरेनची आई वाटत नाही.

शेरिल आणि लॉरेनमध्ये आई आणि मुलीचं नातं असलं तरी लोकांना त्या जुळ्या बहिणीच वाटतात. त्यांच्या २० वर्षांचं अंतर असूनही  दोघींकडे पाहून असं वाटतं की त्या बहिणी आहेत.

लॉरेन जेव्हा १८ वर्षांची झाली. तेव्हापासून लोक तिला आणि तिच्या आईला म्हणजे शेरिलला बहिणी समजतात. दोघीही फिट आहेत आणि मॉडल्सना टक्कर देताना दिसतात. शेरिलकडे पाहून अजिबात वाटत नाही की, ती २ मुलांची आई आहे आणि तिची एक मुलगी २१ वर्षांची आहे.

शेरिल जारविस आणि लॉरेन मार्सडेन एकमेकींसोबत आपल्या संपूर्ण परिवाराच्या फार जवळ आहेत. ते आनंदाचे क्षण एकमेकांसोबत घालवतात आणि बाहेर फिरायलाही सोबतच जातात. ४१ व्या वयातही २० - २२ सारखं दिसणं सोपं नाही. शेरिल फार स्ट्रिक्ट फिटनेस रूटीन फॉलो करते. सोबतच बोटॉक्स थेरपीसाठीही जाते.
 

Web Title: Viral photo of mother daughter duo surprising people