Viral News: पतीने लॉटरीत 1.36 कोटी रुपये जिंकले, पत्नी पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 14:48 IST2022-11-20T14:47:57+5:302022-11-20T14:48:57+5:30
Thailand News: पत्नी आणि पैसे गेल्यामुळे पती खूप दु:खी असून, त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Viral News: पतीने लॉटरीत 1.36 कोटी रुपये जिंकले, पत्नी पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेली
Trending News: दक्षिण आशियाई देश थायलंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला 1 कोटी रुपये घेऊन तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. महत्वाची गोष्ट म्हणजे, हे पैसे तिच्या पतीने लॉटरीत जिंकले होते. पत्नी पैसे घेऊन प्रियकरासह पळून गेल्याची बातमी समजताच पतीला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर त्यांने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
द थायगरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या इसान प्रांतात एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत पोबारा केला. ती सोबत पतीने लॉटरीत जिंकलेले 1 कोटी रुपये घेऊन पळून गेली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पतीने 60 लाख बाह्त(Baht) म्हणजेच सुमारे 1 कोटी 36 लाख रुपये जिंकले होते. पण, त्याची 45 वर्षीय पत्नी आपल्या प्रियकरासह 1 कोटी रुपये घेऊन पळून गेली आहे.
एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. ते लोक विचार करत होते की एवढा पैसा जिंकून आता आपली गरिबी दूर होईल, आता लक्झरी लाइफ जगता येणार आहे. मात्र पत्नी आपला विश्वासघात करून प्रियकरासह पैसे घेऊन पळून जाईल हे त्या व्यक्तीला माहित नव्हते. विशेष म्हणजे, महिला 3 मुलांची आई असून, ती मुलांना पतीच्या घरीच सोडून गेली आहे.